रविवार, ०५ ते ११ नोव्हेंबर २०२३
राशिफल
रविवार, ०५ ते ११ नोव्हेंबर २०२३
{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }
मेष
हा सप्ताह आपणासाठी सर्वसामान्य असेल. आपल्या रागावर, संतापावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहीलं. शांत, स्थिर, संयमी भूमिका ठेवणे आवश्यक राहील. अध्यात्म उपासना यावर भर द्याल. गृहसौख्य, कौटुंबिकसौख्य, संततीसौख्य लाभेल. जोडीदाराशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद, गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी, विनाकारण जोडीदाराचा रोष ओढवून घेऊ नये. सप्ताहाच्या उत्तरार्धात प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. आरोग्याच्या काही तक्रारी सतावतील. मानसिक स्वास्थ्य देखील काहीसे डळमळीत होण्याची शक्यता राहीलं.
वृषभ
आपल्या धाडसी स्वभावाने सप्ताहाच्या सुरुवातीलाच काही धाडसी, महत्त्वपूर्ण निर्णय घ्याल. योग्य नियोजन व त्याला अनुसरून कृती कराल. काही महत्त्वाचे आर्थिक व्यवहार देखील पूर्ण कराल. घरातील काही महत्त्वाची कामे मार्गी लावाल घरातील वातावरण काहीसे असमाधानकारक राहिलं.संततीसौख्य सर्वसामान्य लाभेल. कलाक्षेत्रातील मंडळींसाठी आश्वासक सप्ताह असेल.काही नाविन्यपूर्ण उत्साह, आनंद यांचा अनुभव घ्याल.मित्र मंडळींच्या गाठीभेटी होतील. सप्ताहाच्या उत्तरार्धात काही मानसिक, शारिरीक अनारोग्य जाणवेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. काही स्पर्धक, हितशत्रू डोके वर काढू शकतात.
मिथुन
सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कामाच्या सोबतच कुटुंबालाही प्राधान्य द्याल. कुटुंबीयांसमवेत बाहेर जाण्याचे योग संभवतात. आपल्या बुद्धिचातुर्याने काही धाडस वा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा विचार कराल. मात्र तो करण्याआधी ज्येष्ठांचा सल्ला घेणे आवश्यक राहील. घाईघाईत कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे टाळा. गृहसौख्य उत्तम लाभेल. ज्येष्ठांची सेवा कराल. घरातील वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद प्राप्त कराल. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल. मुलांच्या आरोग्याचीही काळजी घ्या.
कर्क
हा सप्ताह आपणासाठी उत्तम असेल. बऱ्याच दिवसांपासून मनात असलेल्या काही स्वप्नांची, इच्छांची पूर्तता होईल. त्यामुळे एक नवीन उत्साह, ऊर्जा निर्माण होईल. व्यर्थ कामात वेळ न दवडता नियोजन व त्यानुसार योग्य कृती करून हा सप्ताह व्यतीत करा. जोडीदाराशी मात्र वाद विवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. जोडीदाराच्या भावना समजून घ्या. उत्तम गृहसौख्य, वाहन वास्तु सौख्य लाभेल. संततीचे देखील सहकार्य मिळेल. घरातील काही आवश्यक कामे पूर्णत्वास नेतांना काहीशी दगदग, धावपळ होऊ शकते. मात्र घरातील सदस्यांचे सहकार्य आपणास लाभेल.
सिंह
सप्ताहाची सुरुवात काहीशी त्रासदायक, कष्टदायक असेल. काही अप्रिय गोष्टी, घटना यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे चिडचिड, मनस्ताप संभवतो. मात्र आपल्या जिद्दी, मेहनती व दबंग स्वभावाने या सर्वांवर मात करून पुन्हा नव्या उत्साहाने, ऊर्जेने उर्वरित सप्ताह आनंदात व्यतीत कराल. काही महत्त्वाची कामे आपल्या हिमतीवर मार्गी लावाल. परिवारातील सदस्यांचे ही उत्तम सहकार्य मिळेल. कौटुंबिक सौख्य, गृहसौख्य उत्तम मिळेल. घरच्यांच्या मनाप्रमाणे, त्यांच्या आवडीनुसार काही गोष्टी कराल.
कन्या
हा सप्ताह आपणासाठी सर्वसामान्य असेल. सप्ताहाच्या सुरुवातीला व्यापार-व्यवसायात काही लाभ होतील. बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या काही गोष्टी अचानकपणे पूर्णत्वास जातील. प्रियजनांचा सहवास घडेल. अचानक काही अनपेक्षित खर्च उद्भवतील. खर्चाचा ताळमेळ बांधणे आवश्यक राहीलं. अचानक काही मनाविरुद्ध घटना घडल्याने मन: स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असेल. मात्र या सर्वांवर यशस्वी मात करून सप्ताहाचा उत्तरार्ध अधिक जोमाने, उत्साहाने व नवीन विश्वासाने आनंदात व्यतीत कराल.
तुळ
सप्ताहाच्या सुरुवातीला कामाचा अतिरिक्त तणाव जाणवेल. नोकरदार मंडळींवर काही अधिकच्या जबाबदार्या येऊन पडतील. त्यामुळे काहीसा त्रागा होऊ शकतो. कामाच्या धकाधकीत आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. कुटुंबीयांवर काही अतिरिक्त खर्च या सप्ताहात निर्माण होतील. खर्चाचा बोजा वाढल्याने काहीसा तणाव जाणवेल. सप्ताहाच्या मध्यात अचानक काही लाभप्राप्ती संभवते. आपल्या मेहनतीचा, कामाचा योग्य मोबदला आपणास मिळेल. प्रशंसा, वाहवा होईल. त्यामुळे सुखावून जाल. आणि उर्वरित सप्ताह नव्या उमेदीने, जिद्दीने कार्यान्वित व्हाल.
वृश्चिक
सप्ताहाच्या सुरुवातीलाच नशीबाची, भाग्याची उत्तम साथ मिळेल. काही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. गुरुतुल्य व्यक्तींचा सहवास लाभेल. काही दानधर्म देखील कराल. आपल्या दैनंदिन कामात देखील व्यस्त राहाल. कामाच्या ठिकाणी काही अतिरिक्त जबाबदाऱ्या आपल्यावर येऊन पडल्याने काहीशी चिडचिड, दगदग संभवते. मात्र आपण आपले कर्तव्य यशस्वीपणे पार पाडाल. त्यातूनच लाभाची, सौख्याची व आनंदाची प्राप्ती कराल. अधिकारी, सहकारी यांच्या कौतुकास पात्र व्हाल. सप्ताहाच्या अखेरीस आर्थिक नियोजन आवश्यक राहील.
धनु
सप्ताहाच्या सुरुवातीला काही अडचणींचा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. परिवारात छोट्या-मोठ्या कुरबुरी संभवतात. घरातील सदस्यांशी काही मतभेद होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. कोणत्याही प्रलोभनांना,आमिषांना बळी पडू नका. सप्ताहाचा मध्य मात्र उत्तम जाईन काही दूरचे प्रवास होण्याची शक्यता राहील. मात्र प्रवासात योग्य ती खबरदारी घ्यावी. काही धार्मिक स्थळांना भेट द्याल. नोकरी व्यवसायातही चोखपणे आपले कर्तव्य पार पाडाल. आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्याने कर्तव्यपूर्तीचा आनंद घ्याल.
मकर
या सप्ताहाच्या सुरुवातीला कामाला अधिक महत्त्व द्याल. इतरांवर विसंबून न राहता आपली कामे आपणच पूर्ण करण्याकडे कल असेल. आपल्यातील योग्यता, क्षमता यांचा योग्य वापर करत कर्तव्यपूर्तीचा आनंद घ्याल. काही अनपेक्षित लाभ देखील संभवतात. समाजात नावलौकिक, प्रतिष्ठा, मानसन्मान प्राप्त होईल. सप्ताहाच्या उत्तरार्धात काहीसे नैराश्य, उदासीनता जाणवेल. तब्येतीच्याही काही तक्रारी जाणवतील. अचानक खर्चातही वाढ होऊ शकते. मात्र आपल्या मूळ दबंग स्वभावाने या सर्वांवर मात करून पुन्हा नवीन उत्साहाने कामाला लागाल.
कुंभ
सप्ताहाची सुरुवात उत्साहाने होईल. काही शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक कार्यात स्वतःला गुंतवून घ्याल. तज्ञ, ज्येष्ठ, विद्वान व्यक्तींचा सहवास लाभू शकतो. काही अनोळखी व्यक्तींशी परिचय होऊ शकतो. आपल्या कामाप्रती, कर्तव्याप्रती दक्ष राहून काम पूर्ण करण्याकडे कल राहीलं. वैवाहिक जोडीदाराशी स्नेहाचे, सलोख्याचे संबंध प्रस्थापित करा. गैरसमज, वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. काही अनावश्यक खर्च उद्भवतील. खर्चाचा ताळमेळ बांधणे गरजेचे राहील. आर्थिक व्यवहार सांभाळून करावेत.
मीन
सप्ताहाच्या सुरुवातीला काही अप्रिय घटना घडू शकतात. त्यामुळे मानसिक अस्थिरता निर्माण होईल. मात्र आपले लक्ष विचलित होऊ देऊ नका. कुटुंबियांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. त्यांच्यावर विनाकारण चिडचिड करू नका. सप्ताहाच्या मध्यात आपल्यातील बुद्धिमत्तेचा योग्य वापर करत शांतपणे आपण सौख्याची प्राप्ती कराल. काही गुरुतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन वा सहवास घडेल. आपल्या नोकरी व्यवसायातही नवीन संधी निर्माण होतील. त्यामुळे अधिक जोमाने कामाला लागाल. काही लाभांची देखील प्राप्ती होईल.