Skip to content

बुधवार, ०५ मार्च २०२५

राशिफल

बुधवार, ०५ मार्च २०२५

मेष
आज कौटुंबिक सौख्याचा आस्वाद घ्याल. कुटुंबियांचे उत्तम सहकार्य लाभेल. आज आपल्या आवडीनिवडीतून धनप्राप्ती कराल.

वृषभ
आजचा दिवशी सकारात्मक ऊर्जा व अभूतपूर्व उत्साह यांनी परिपूर्ण असेल. आपल्या मर्जीने, आपल्या इच्छेनुसार आजचा सुंदर दिवस व्यतीत कराल.

मिथुन
आजचा दिवस काहीसा तणावयुक्त, चिंताग्रस्त जाईल. विनाकारण कोणाशीही वादविवाद, कटकटी होणार नाहीत याची काळजी घ्या. खर्चाचे गणित काहीसे सांभाळावे लागेल.

कर्क
आज अनेक दिवसांपासूनची तपश्चर्या कामी येईल. आज लाभाची, आनंदाची प्राप्ती होईल. त्यामुळे सुखावून जाल. मित्र मंडळीच्या गाठीभेटी होतील.

सिंह
आज मेहनत,परिश्रम, कष्ट करून कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील राहाल. आज आपले संपूर्ण लक्ष आपल्या कामावर राहिलं.

कन्या
आजच्या दिवशी भाग्याची, नशीबाची साथ मिळेल. आज गुरुजन, पूजनीय व्यक्तींचा सहवास लाभेल. काही प्रवास संभवतात.

तुळ
आजच्या दिवशी अनेक अडचणी, अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. कोणाशीही वादविवाद, कटकटी यांसारखे प्रसंग टाळा.

वृश्चिक
आज वैवाहिक जीवनात दोघांमधील सख्य वाढेल. जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य लाभेल. व्यवसायात काही नवीन संधी उपलब्ध होतील.

धनु
आज काहीशी मानसिक, शारीरिक अस्वस्थता जाणवेल. आरोग्याच्या समस्या सतावतील. काही स्पर्धक, हितशत्रू डोके वर काढतील.

मकर
आजचा आपला दिवस उत्साहाने व्यतित कराल. संततीकडे लक्ष द्याल. संततीसोबत अमूल्य वेळ घालवाल. आजचा संपूर्ण दिवस आनंदात जाईल.

कुंभ
आजच्या दिवशी घरात रममाण व्हाल. घरच्यांसाठी वेळ काढाल. घरातील खूप दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे आज पूर्ण कराल. काही खरेदीही कराल.

मीन
आजच्या दिवशी पराक्रमातून लाभाची प्राप्ती कराल. आपल्यातील क्षमतांचा योग्य वापर करून आज आपले कार्य सिद्ध कराल. आज काही प्रवासाचे योग संभवतात.