Skip to content

शनिवार ०५ मार्च २०२२

राशीभविष्य

 

शनिवार ०५ मार्च २०२२

{आज ज्यांचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस आहे त्या सर्वांना शुभेच्छा आणि आशीर्वाद}

मेष
आज काही गोष्टी इच्छेविरुद्ध घडण्याची शक्यता आहे. अचानक काही खर्च होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे आज शक्यतो टाळा.

वृषभ
आजचा दिवस लाभाचा असेल. तुमच्या कर्तुत्वाने तुम्हाला पद, प्रतिष्ठा, यश, कीर्ती, नाव मिळेल. तुमच्या मेहनतीचे फळ आज तुम्हाला मिळेल.

मिथुन
आज तुम्ही दिवसभर कामात व्यस्त असाल. आज आपल्याला थोडे कष्ट करावे लागतील. तुमच्या मेहनतीत दिरंगाई करू नका.

कर्क
आज कशी घटना तुमच्या इच्छेनुसार घडतील. ज्याचा खरा प्रत्यय, अनुभव आज येईल. आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. ज्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल.

सिंह
आज काही अप्रिय लोकांना सामोरे जावे लागू शकते. खंबीर बुद्धीने, चिकाटीने आणि संयमाने त्याचा सामना केला पाहिजे. निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका.

कन्या
आज तुम्ही चांगले वैवाहिक जीवन अनुभवाल. तुम्ही सौख्य, प्रेम आणि आनंद अनुभवाल. जोडीदारालाही आनंदी ठेवाल. जोडीदाराच्या आवडीनिवडीचा विचार कराल.

तुळ
आज काही अनपेक्षित घटना, समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पण विचलित न होता फक्त तुमच्या दिनचर्येवर लक्ष केंद्रित करा.

वृश्चिक
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. आज तुम्ही तुमच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. मुलांची तळमळ राहील. त्यांच्यावरही बारीक लक्ष ठेवण्याची गरज भासणार आहे.

धनु
आजचा दिवस आनंदात जाईल. आजचा दिवस तुम्ही तुमच्या स्वेच्छेने घालवाल. ज्येष्ठांच्या मताचा आणि इच्छेचा आदर कराल.

मकर
आजचा दिवस धैर्य आणि पराक्रमाचा असेल. आजचा दिवस तुम्ही तुमच्या इच्छेनुसार व्यतीत कराल . व्यवसाय वाढीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्याल.

कुंभ
आज काही आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुमची बुद्धिमत्ता आणि हुशारी यांची सांगड घालून तुम्ही तुमचे काम पूर्ण कराल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.

मीन
आजचा दिवस खूप चांगला, उत्साहाने भरलेला असेल. आज तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त काहीतरी मिळेल. सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. जोडीदाराचे सहकार्यही मिळेल.