Skip to content

सोमवार, ०४ ऑगस्ट २०२५

राशिफल

 

सोमवार, ०४ ऑगस्ट २०२५

*मेष*
आजचा आपला दिवस काहीसा चिंताग्रस्त असू शकतो. त्यामुळे आपले मन व विचार शांत आणि स्थिर ठेवा. आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. अनाठायी खर्च टाळा.

*वृषभ*
आज व्यापारी व व्यावसायिकांसाठी लाभदायक दिवस राहिलं. वैवाहिक जोडीदारासोबत आज मैत्रीपूर्ण संबंध राहतील. आपले प्रेम वृद्धिंगत होईल. हितशत्रूंवर देखील विजय मिळवाल.

*मिथुन*
आज नोकरदार मंडळींसाठी काहीसा मनस्ताप देणारा दिवस असू शकतो. आरोग्याच्या तक्रारीत वाढ होऊ शकते. आज व्यवहार कुशलता दाखवावी लागेल.

*कर्क*
आजचा आपला दिवस उत्साह व आनंद यांनी परिपूर्ण असेल. आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासाने सुखावून जाल. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी उपयुक्त दिवस असेल.

*सिंह*
आज आपल्या कुटुंबीयांसमवेत आनंदात वेळ घालवाल. एखादे आवडते पुस्तक वाचाल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली काही कामे आज मार्गी लागतील.

*कन्या*
आजचा आपला दिवस पराक्रमाचा असेल. आज काही छोटे प्रवास संभवतात. आज नवनवीन गोष्टी शिकण्याकडे कल राहीलं. आज काही महत्त्वपूर्ण निर्णय देखील घ्याल.

*तुळ*
आजच्या दिवशी कौटुंबिक सौख्याचा आस्वाद घ्याल. आज आपल्या बोलण्याने कोणी दुखावले जाणार नाही ना याची काळजी घ्यावी. आर्थिक गणिते सोडविताना सावधगिरी बाळगावी.

*वृश्चिक*
आजचा आपला दिवस अतिशय उत्तम आहे. तो आपण अतिशय छान पद्धतीने व्यतीत कराल‌ आज मन प्रसन्न राहीलं. एखादा छंद, कला यांची जोपासना कराल.

*धनु*
आज काहीसा मानसिक व आर्थिक मनस्ताप संभवतो. आज कामानिमित्त दूर राहावे लागू शकते. आजच्या दिवशी स्वतःचा तोल ढळू देऊ नका. अनावश्यक खर्च टाळा.

*मकर*
आजचा आपला दिवस यशाचा जाणार आहे. केलेल्या मेहनतीचे आज चीज होईल. बर्‍याच दिवसांपासून हुलकावणी देत असलेले यश आज प्राप्त होईल.

*कुंभ*
आजचा आपला दिवस अतिशय व्यस्त राहील. कौटुंबिक कामे पूर्णत्वास नेण्याकडे आज आपला कल राहील. काही महत्त्वाचे आर्थिक व्यवहार चातुर्याने पूर्ण कराल.

*मीन*
आजचा दिवस स्वच्छंदीपणे व्यतीत कराल. अनोळखी व्यक्तींशी गाठीभेटी होतील. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. तुमच्या पराक्रमाला अधिक बळ देईल. नवीन अधिकार प्राप्त होतील.