Skip to content

बुधवार, ०२ नोव्हेंबर २०२२

राशीभविष्य

बुधवार, ०२ नोव्हेंबर २०२२

{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }

मेष
आज आपण आपल्या कर्तव्याला जास्त महत्त्व द्याल. कर्तव्यपूर्ती करतांना काही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घ्याल. आज आपले संपूर्ण कसब पणाला लावाल.

वृषभ
आज नशिबाची, भाग्याची, सौख्याची प्राप्ती होईल. इतरांना देखील आनंद, सुख, समाधान देऊन आपला आनंद द्विगुणीत कराल. काही धार्मिक, शैक्षणिक कार्यात सहभागी व्हाल.

मिथुन
आज कोणतेही कार्य करतांना थोडी सावधगिरी बाळगावी. अति उत्साहात, घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नये. अचानक काही धन लाभ होण्याची शक्यता आहे.

कर्क
आजचा आपला दिवस चांगला असेल. व्यवसायात काही नवीन संधी चालून येतील. काही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना जोडीदाराचे मत विचारात घ्या. जोडीदाराचेही उत्तम सहकार्य आज मिळेल.

सिंह
आज कामाचा अतिरिक्त तणाव जाणवेल. काही मानसिक चिंता सतावतील. नोकरदार, व्यावसायिकांनी योग्य काळजी घ्यावी .

कन्या
आजच्या दिवशी मनोवांच्छित इच्छांची पूर्तता होईल. आपल्या ध्येयावर लक्ष ठेवून त्यानुसार मार्गक्रमण कराल. काही महत्त्वाची कामे देखील आजच्या दिवशी हातावेगळी कराल.

तुळ
आज घरातील कामांमध्ये आपला उत्साह अभूतपूर्व असेल. बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे आज वेगाने पूर्ण कराल. मनातील काही अपेक्षा पूर्ण होतील.

वृश्चिक
आजच्या दिवशी काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. व्यवसाय वृद्धीसाठी एखादे धाडस कराल. विशिष्ट पदाची प्राप्ती कराल. प्रियजनांच्या गाठीभेटी संभवतात.

धनु
आज आपल्या कामाचा व्याप सांभाळत आपल्या कुटुंबियांनाही वेळ द्याल. कुटुंबियांच्या भावना, इच्छा समजून घ्याल. परिवाराचा विश्वास संपादन कराल.

मकर
आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. व्यावसायिक, व्यावहारिक यशप्राप्ती आज संभवते. योग्य नियोजन, योग्य निर्णय व त्यानुसार कृती आज साधावी.

कुंभ
आज आपली काहीशी विमनस्क अवस्था असेल. आज अचानक काही धन प्राप्ती संभवते. मात्र त्याचरोबर अनेक खर्चही करावे लागतील.

मीन
बऱ्याच दिवसांपासून घेत असलेल्या परिश्रमाचे उत्तम फलित आज प्राप्त होईल. अधिकारी, सहकारी प्रशंसा करतील. आजच्या दिवसाचा सदुपयोग करून घ्या