शनिवार, ०२ सप्टेंबर २०२३
राशिफल
शनिवार, ०२ सप्टेंबर २०२३
{ आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }
मेष
आपल्या मूळच्या धडाकेबाज स्वभावाला व सतत कृतिशील वृत्तीला अनुसरून आजच्या दिवसाचा जास्तीत जास्त लाभ करण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचदा आपण पटकन समोरच्याला काहीतरी बोलून जातात, आज आपल्या बोलण्यावर ताबा ठेवणे आवश्यक राहीलं.
वृषभ
आज आपल्या कामधंद्याचे नियोजन करण्यासोबतच पारिवारिक सुखाचाही आनंद घ्याल. कुटुंबासमवेत त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न कराल. प्रसंगी एखाद्या शुभकार्यात व धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
मिथुन
आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय सुंदर व महत्त्वाचा राहीलं. आपण नाविन्यपूर्ण गोष्टींचे भोक्ते असल्याने आज काहीतरी नवीन गोष्टी करण्याकडे आपला कल राहीलं.
कर्क
आपला मूळ स्वभाव संवेदनशील व हळवा आहे. आज काही गोष्टी मनाविरुद्ध घडण्याची शक्यता राहीलं. त्यामुळे लक्ष विचलित न होऊ देता आपले नित्य कर्म करीत राहा. वाद-विवाद, कटकटी सारखे प्रसंग टाळा.
सिंह
आपला मूळ स्वभाव सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा आहे. त्यामुळे आज आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल. आज लाभ, यश, आनंदाची प्राप्ती कराल. मित्रमंडळींसमवेत आजचा दिवस मजेत जाईल.
कन्या
आपण मुळतः बुद्धिमान, हरहुन्नरी, व्यवहारकुशल आहात. आज आपल्यातील या कलागुणांचा वापर करून आपले इच्छित कार्य पूर्णत्वास न्याल. आजचा संपूर्ण दिवस कार्यमग्न राहाल. वेळेचे योग्य नियोजन आज साधावे लागेल.
तुळ
आपण मूळत: कलाप्रिय व रसिक स्वभावाचे आहात. आपल्यातील कलागुण, रसिकता, मधुर बोलणे – वागणे यांचा योग्य वापर करून आज भाग्याची, सौख्याची प्राप्ती कराल. नोकरीनिमित्त प्रवासाचे योग संभवतात.
वृश्चिक
आजचा आपला दिवस काहीसा चिंताग्रस्त, तणावयुक्त असू शकतो. आपल्यातील ताकद, धडाडी, शौर्य यांचा अतिरेक आज टाळावा. मन शांत व बुद्धी स्थिर ठेवावी. नको त्या गोष्टीत विनाकारण लक्ष देणे टाळावे.
धनु
सदैव उत्साही, संशोधनप्रिय, लढवय्या असे आपले व्यक्तिमत्त्व आहे. त्यानुसार आजही आपण उत्साही, आनंदी असाल. वैवाहिक जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य मिळेल. आपणही जोडीदाराला मनासारखा वेळ द्याल. काही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना जोडीदाराचे मत विचारात घ्याल.
मकर
आजचा आपला दिवस काहीसा खडतर असेल. मात्र आपण मुळतः मेहनती व कष्टकरी आहात त्यामुळे आजही आपण आपले नित्यकर्म करण्यावर लक्ष ठेवा. आरोग्याच्या काही तक्रारी आज सतावतील. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
कुंभ
आपण मूळत: बुद्धिमान, ज्ञानी आहात. आजचा दिवसही आपण आपल्या बुद्धिचातुर्याने अगदी आनंदात, मजेत व्यतीत कराल. आपल्यातील सुप्त कलागुण, छंद, आवडीनिवडी यांच्यासाठी आज वेळ काढाल.
मीन
आजचा आपला दिवस उत्तम गृहसौख्याचा आहे. आपल्या गोड, नम्र, ममताळू स्वभावाने आज घरातील सर्वांची काळजी घ्याल. घरातील बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेली कामे आज झपाट्याने पूर्ण कराल. घरातील ज्येष्ठांची सेवा करून त्यांचे आशीर्वाद देखील प्राप्त कराल.