सोमवार, ०१ ऑगस्ट २०२२
राशीभविष्य
सोमवार, ०१ ऑगस्ट २०२२
{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }
*मेष*
आजचा दिवस आपणासाठी उत्साहाचा, आनंदाचा असेल. आपल्यातील सुप्त कलागुणांना आज वाव मिळेल. त्यातून सौख्याची प्राप्ती होईल. कला-क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी मिळतील.
*वृषभ*
आजच्या दिवशी उत्तम गृहसौख्याचा आनंद घ्याल. आज आपले घर स्वच्छ, टापटीप, नीटनेटके ठेवण्यामध्ये कल राहील. कुटुंबातील सदस्यांचे उत्तम सहकार्य आज मिळेल.
*मिथुन*
आज आपल्या बुद्धीचातुर्याचा वापर करून काही महत्त्वाची कामे मार्गी लावाल. आज आपल्या आवडीनिवडी जोपासण्यासाठी देखील वेळ काढाल. कामानिमित्त प्रवासाचे योग संभवतात.
*कर्क*
आज पारिवारिक कारणांसाठी बाहेर जाण्याचे योग संभवतात. कुटुंबीयांचे उत्तम सहकार्य आज लाभेल. कुटुंबीयांसाठी काही खर्च देखील संभवतात.
*सिंह*
आजचा दिवस आपणासाठी उत्तम असणार आहे. आपल्यातील उत्साहाचा, कर्तुत्वाचा प्रभाव इतरांवर पाडाल. आज आपल्या धाडसी व नेतृत्वगुणी स्वभावाने अनेक समस्यांना सहज पार कराल.
*कन्या*
आजच्या दिवशी काही शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान संभवते. मनाविरुद्ध काही गोष्टी घडण्याची शक्यता असेल. आजच्या दिवशी मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
*तुळ*
इतक्या दिवसांपासून घेत असलेल्या मेहनतीची शुभ फले आज प्राप्त होतील. आपल्यातील कलागुणांनी लोकांवर आपली सकारात्मक छाप आज सोडाल आणि मानसन्मान व कीर्ती प्राप्त कराल.
*वृश्चिक*
आज आपल्या मूळ धाडसी व मेहनती स्वभावाला अनुसरून केवळ कर्माला प्राधान्य द्याल. मात्र केलेल्या कष्टांचे अपेक्षित यश आज मिळणार नाही. कामाचा काहीसा ताण जाणवेल.
*धनु*
आजचा आपला दिवस भाग्यप्राप्ती, सौख्यप्राप्तीचा असेल. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या काही इच्छांची पूर्तता आज होईल. त्यामुळे आनंदाने सुखावून जाल.
*मकर*
आजच्या दिवशी काही त्रासदायक, क्लेशदायक गोष्टी घडू शकतात. प्रकृती व मनस्थिती दोन्हीही अस्थिर राहू शकते. विनाकारण वाद-विवाद, कटकट यासारखे प्रसंग टाळा.
*कुंभ*
आजच्या दिवशी जोडीदाराशी स्नेहाचे, सौख्याचे, सलोख्याचे संबंध प्रस्थापित होतील. उभयतांमधील प्रेम वृद्धिंगत होईल. आजच्या दिवशी सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न कराल.
*मीन*
आजचा दिवस काहीसा असमाधानकारक जाऊ शकतो. प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. आपल्यातील योग्यता, क्षमता, कर्तुत्व यांची योग्य दखल आज घेतली जाणार नाही.