Skip to content

मोफत अभ्यासवर्ग ज्योतिषशास्त्राचे... सोने करा संधीचे ..!

मोफत अभ्यासवर्ग ज्योतिषशास्त्राचे… सोने करा संधीचे ..!
प्रवेश १५ ते २० एप्रिल ( फक्त पाच दिवस ) 15 एप्रिल रोजी हा फोर्म ओपन होईल तो सबमिट करावा 20 एप्रिल ही प्रवेशाची शेवटची मुदत आहे
१ मे पासून १० व्या बॅचचा शुभारंभ . 1 मे रोजी प्रत्यक्ष अभ्यास सुरू होईल

इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे आज ब-याच गोष्टी सोप्या व सुलभ झाल्या आहेत. प्रत्येकजण जास्तीत जास्त ऑनलाईन राहून अपडेट राहण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यात सोशल मीडियाने निर्माण केलेल्या सुविधांनी अधिकची भर घातलेली आहे. याच सुविधांचा वापर ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी करता आला तर…? थोडक्यात सोशल मीडियाचा, इंटरनेटचा सदुपयोग करुन आपण घरी बसल्या अमूल्य असे ज्योतिषशास्त्र अगदी विनामूल्य शिकु शकतो.

आपल्या ऋषी मुनींच्या अथक परिश्रमातून निर्मिले गेलेले ज्योतिषशास्त्र आज हजारो वर्षांनंतरही मनुष्य जीवनाला अगदी तंतोतंत लागू पडते. कारण मनुष्य जीवनाच्या कल्याणासाठीच त्याची निर्मिती केली गेली आहे . ज्योतिषशास्त्र हे शास्त्र म्हणजे विज्ञान आहे. विज्ञानात ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे नियम आहेत, अगदी तसेच ज्योतिषशास्त्रातही आहेत. मात्र ते समजून घेण्यासाठी आधी शास्त्राला शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेणे, अभ्यासणे आवश्यक आहे. ज्योतिषी भाग्य बदलवू शकत नाही, हे जरी खरे असले तरी आपल्या भाग्यातील शुभ – अशुभ काळ ओळखून आपल्या आयुष्याला योग्य ती दिशा नक्कीच देऊ शकतो.

https://forms.gle/81urMPbqyfKnot296

त्यामुळे या अलौकिक अशा शास्त्राला घरात घरात पोहचविण्यासाठी, जास्तीत जास्त लोकांना या शास्त्राचा लाभ मिळवून देण्यासाठी, शास्त्राविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही मौल्यवान असे ज्योतिषशास्त्र शिका ऑनलाईन व विनामूल्य हा अभिनव असा उपक्रम सुरु केला. ज्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आतापर्यंत ज्योतिषशास्त्र प्रेमी व अभ्यासकांकडून लाभला आहे. आतापर्यंत ९ बॅच पूर्ण झाल्या असून हजारो अभ्यासक त्यात ज्योतिषशास्त्राचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करीत आहेत. अभ्यासकांची वाढती संख्या लक्षात घेता आम्ही दि. १५/०४/२०२१ पासून दहाव्या बॅचच्या ऍडमिशन चा श्रीगणेशा करीत आहोत. अभिमानाची बाब म्हणजे ज्योतिषशास्त्र प्रेमी आणि अभ्यासकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे आम्हाला आमच्या मूळ उद्देशाच्या कक्षा विस्तारायला भाग पाडले. परिणामी बेसिक ज्योतिषशास्त्रापासून सुरु झालेला अभ्यासकांचा प्रवास आज ज्योतिष प्रवीण , ज्योतिष विषारद, ज्योतिष भास्कर , ज्योतिष अलंकार सर्टिफिकेट कोर्स पर्यंत येऊन पोहचला आहे, ही निश्चितच सर्वांसाठी खूप मोठी बाब आहे. विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार, गृहिणी अशा सर्वच स्थरातील ज्योतिषशास्त्र प्रेमी व अभ्यासक या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. महत्त्वाचे म्हणजे जे आधीपासून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत होते, पौरोहित्य करीत होते त्यांनीही या संधीचा लाभ घेत, आपले ज्ञान, अभ्यास वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.

ज्यांना या शास्त्राचा खरोखरच शास्त्रशुद्ध अभ्यास करायचा आहे, त्या सर्वांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा. आता सुरु होणारी बॅच ही ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाची प्राथमिक बॅच आहे. हा अभ्यासक्रम ऑनलाईन असणार असून परिक्षा देखिल ऑनलाईनच होणार आहे. तसेच परिक्षेत उत्तीर्ण होणा-या अभ्यासकांना सर्टिफिकेट देखिल ऑनलाईनच प्राप्त होईल. जे अभ्यासक प्रथम परिक्षा उत्तीर्ण होतील त्यांनाच पुढील कोर्सला अ‍ॅडमिशन मिळेल. या अभ्यासक्रमा साठी आवश्यक व उपयुक्त अशी एकूण ६ पुस्तक आहेत जी संस्थेने प्रकाशित केलेली आहेत . ही पुस्तक संस्थेच्या वेबसाईट वर डिस्काउंट सह अभ्यासकांना उपलब्ध आहे

थोडक्यात आधुनिक साधनांचा सदुपयोग करीत पारंपारिक शास्त्र शिकण्याची संधी तुम्हाला या माध्यमातून प्राप्त होत आहे.

दि.१० जुन पासून या बॅचच्या अभ्यासक्रमाला सुरुवात होणार असून त्याआधी नावनोंदणी करणे अनिवार्य असणार आहे. नावनोंदणी करणा-या अभ्यासकांना व्हाट्सअप ग्रुप मध्ये घेण्यात येईल तिथे अभ्यास करवुन घेतल्या जाईल रजिस्ट्रेशन नंबर देण्यात येईल व त्यांनाच परिक्षेला देखिल बसता येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

८. या लिंक वर तुम्हाला पुस्तके उपलब्ध होतील


 https://drjyotijoshi.com/books/

शुभम भवतू!