Skip to content

🌸 दसरा संकल्प 🌸

ज्योतिषशास्त्र म्हणजे…

आपल्या संस्कृतीने, आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला दिलेली अनमोल भेट आहे. त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आपण काय करु शकतो? तर आपण ज्योतिषशास्त्राचा उचित सन्मान करु शकतो. शास्त्राचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करु शकतो. शास्त्राला सखोलतेने समजण्याचा प्रयत्न करु शकतो.

ज्योतिषशास्त्राच्या मदतीने आपण आपल्या आजुबाजुच्या लोकांचे दु:ख, त्यांच्या समस्या कमी करु शकतो. त्यांचा संघर्ष कमी करु शकतो. त्यांचं जीवन अधिक सुखद आणि सुखकर बनण्यासाठी प्रयत्न करु शकतो. शास्त्राची महती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करु शकतो.

या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपण सर्वजण मिळून संकल्प करु शकतो की, ज्योतिषशास्त्राला घेऊन आपल्या समाजात जी नकारात्मकता पसरलेली आहे, ती दुर करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. ज्योतिषशास्त्रासाठी सर्वजण एकत्र येऊन, संघटित होऊन एक चळवळ सुरु करायची आहे आणि या महान शास्त्राला घराघरात पोहचवायचे आहे.

🔹आपल्याला काय करायचं आहे?🔹

दसऱ्याच्या दिवशी म्हणजे बुधवार, दि. ०५ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ठिक ११ वाजता आपण सर्वजण ऑनलाईन प्रतिज्ञा करुया. झूम, फेसबूक व युट्यूबच्या माध्यमातून संघटित होऊन आपण सर्वजण संकल्प करुया की…

समाजात पसरलेल्या नकारात्मक भावाला जाळून सकारात्मक मार्गाने आपण पुढे जात राहू. आपण स्वत: ज्योतिषशास्त्राचा सखोलतेने अभ्यास करु आणि इतरांना देखील त्यासाठी प्रेरीत करु. जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत हे अनमोल ज्ञान पोहचविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू. ज्यामुळे एक सकारात्मक चळवळ सुरु होऊन ज्योतिषशास्त्र घराघरात पोहचू शकेल. ज्योतिषप्रेमी म्हणून आपल्या सर्वांचं हे कर्तव्य असेल.

या अभिनव अशा उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला आधीच गुगल फॉर्मद्वारे नावनोंदणी करावी लागेल. तसेच सहभाग शुल्क म्हणून केवळ ०१ रुपया फी ऑनलाईन भरावी लागेल.

(या उपक्रमाचं गांभीर्य टिकून राहावं व खरोखर जे ज्योतिषप्रेमी आहेत, शास्त्राविषयी ज्यांना खरोखरच आत्मियता आहे आणि समाजातील नकारात्मकता दुर व्हावी, असं ज्यांना मनापासून वाटतं केवळ त्यांनीच या उपक्रमात सहभागी व्हावं म्हणून ही फी ठेवण्यात आलेली आहे.)

॥ जय ज्योतिष ॥

॥ जय भारत ॥

मी ज्योतिषप्रेमी.. माझी जबाबदारी

आपण आमच्या मताशी सहमत असाल, हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल व या चळवळीत तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर या मॅसेजमध्ये आपलं नाव, आपल्या संस्थेचं नाव लिहून त्याला पुढे पाठवा. जेणे करुन जास्तीत जास्त ज्योतिषप्रेमी या चळवळीत सहभागी होऊ शकतील.

  • एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी
  • श्री ज्योतिष संशोधन केंद्र, जळगाव
  • फेसबूक ग्रुप – अभ्यास ज्योतिषशास्त्राचा
  • फेसबूक ग्रुप – आवड ज्योतिषशास्त्राची
  • भविष्य दर्पण (ई मासिक)

फॉर्म भरण्यापूर्वी, या क्यूआर कोडवर 1 रुपया करा आणि त्याचा स्क्रीन शॉट घ्या! त्यानंतरच तुम्ही फॉर्म पूर्णपणे भरू शकाल. ⮯⮯⮯⮯

Form Link Coming Soon ⮯

मराठी चैनल ->

हिंदी चैनल ->