Skip to content

नमस्कार!

कधी कधी ज्योतिष प्रेमी व अभ्यासकांचं प्रेम पाहून भावना व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात. आपल्या संस्कृतीनुसार दसरा हा अत्यंत महत्त्वाचा सण! सरस्वती पूजन आपण या दिवशी करतो. हजारोने अभ्यासक त्यासोबतच आपल्या शास्त्राचंही पूजन करीत आहेत. या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो.
आपल्या थोर ऋषीमुनींनी हे जे शास्त्र निर्माण केलंय त्याला घराघरात सन्मान दिला जातोय, ज्योतिष प्रेमींच्या मनात सन्मान दिला जातो आहे. ही पूजा जेव्हा या पुस्तकांची केल्या जाते तेव्हा ती पूजा ती सरस्वतीची असते.. त्या ऋषीमुनींची असते.. ज्यांनी आपल्याला मानवी कल्याणासाठी हे शास्त्र बहाल केलं त्यांची असते. त्या सगळ्यांना मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद! इथे भावना व्यक्त करायला खरोखरच शब्द अपुरे पडताय.

धन्यवाद!

शुभम भवतू!

मराठी चैनल ->

हिंदी चैनल ->