आपल्या संस्थेद्वारे संचालित, ज्योतिष्य विद्यावाचस्पती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपण आज ज्योतिषरत्न परीक्षा देण्यासाठी उत्सुक आहात. अर्थात जसजशा परीक्षा वाढत जातात, तस तशी त्याची काठीण्य पातळी देखील वाढत जाते.
, आपल्याला नेमून दिलेल्या विषयांपैकी, कोणतेही पाच विषय घेऊन, प्रत्येक विषयाच्या 10 याप्रमाणे एकूण 50 कुंडल्यांचा प्रबंध, निर्धारित सूचनांप्रमाणे तयार करून, जून मध्ये होणाऱ्या प्रत्यक्ष परीक्षेत, परीक्षा हॉलवर आपणास तो सादर करावयाचा आहे.
💢 त्याचप्रमाणे, अजून एक पाच कुंडल्यांचा विशेष लघु प्रबंध आपल्याला सादर करावयाचा आहे .आपल्याला काही विशिष्ट 5 व्यक्तींच्या कुंडल्याचा ( ज्यांच्या प्रतापाने समाज जीवन ढवळून निघाले आहे, बरीचशी जीवन हानी झाली आहे. त्यांच्या गैरकृत्यांनी संस्कृतीचा ऱ्हास झालेला आहे अशा )पण लघु प्रबंध सादर करावयाचा आहे.
💢 वरील दोन्ही प्रबंध, लेखी परीक्षेचा एक भाग असून, त्यावर मिळणारे गुण, हे परीक्षाफलात अंतर्भूत असणार आहेत.
💢 प्रश्नपत्रिका 1 – चार-पाच ओळीत उत्तरे द्या. ( एकूण प्रश्न 30 प्रत्येकी गुण-4 = एकूण 120 गुण)
💢 प्रश्नपत्रिका 2 – सविस्तर उत्तरे द्या( एकूण प्रश्न 30 – प्रत्येकी 10 गुण = एकूण 300 गुण.
💢 या दोन्ही प्रश्नपत्रिका, वितरित झाल्यानंतर एका विशिष्ट मुदतीत, घरून सोडवावयाच्या आहेत. सादरीकरणाची अंतिम तारीख, पाळणे बंधनकारक राहील.
💢 या प्रश्नपत्रिका कधी वितरित होणार?याबद्दल नंतर सूचना मिळतील.
💢 तसेच या परीक्षेची उर्वरित फी भरण्यासाठी, स्वतंत्र सूचना मिळतील.
⚛️ प्रत्यक्ष परीक्षा हॉलवर ⚛️
◾️प्रश्नपत्रिका एक – योग्य पर्याय द्या.एकूण प्रश्न 50 प्रत्येकी एक गुण ( मुदत वीस मिनिट )
◾️ प्रश्नपत्रिका दोन – रिकाम्या जागा भरा. – प्रश्न 50 प्रत्येकी एक गुण ( वेळ 20 मिनिट )
◾️ प्रश्नपत्रिका 3 – चूक की बरोबर ते लिहा – प्रश्न 50, प्रत्येकी एक गुण ( वेळ वीस मिनिट )
◾️ परीक्षा हॉलवर दोन पत्रिकांचा तपशील दिला जाईल. प्रत्येक पत्रिकेवर चार प्रश्न विचारले जातील. प्रत्येक पत्रिकेचा वेळ 1 तास 30 मिनिट असेल. व प्रत्येक पत्रिकेचे गुण 100 असतील.
💢 वरील सर्व प्रश्नपत्रिका,
◾️ आपल्याला या अगोदर दिलेल्या परीक्षांचा सर्व अभ्यासक्रम,
◾️ J J पद्धतीवरील प्रसारित झालेले व्हिडिओज,
◾️ राहुरहस्य भाग एक ते चार ◾️ माझा जन्म याच राशीत का झाला? ◾️ राशी रहस्य- स्त्री व पुरुष – एकूण 24 भाग यावरील व्हिडिओज, यावर आधारित राहणार आहे.
ज्यो.रत्नाच्या गुणांची विभागणी असे असेल का?
◾️ मूळ प्रबंध -50 = 500
◾️ लघु प्रबंध -5 = 50
◾️ लघु उत्तरे -30 =120
◾️ दीर्घ उत्तरे -30 =300
◾️ योग्य पर्याय-50=50
◾️ रिकाम्या जागा -50=50
◾️ चूक बरोबर -50=50
◾️ परीक्षण कुंडल्या -2=200
एकूण गुण = 1320
परीक्षा समन्वयक,
पुंडलिक दाते, ज्योतिष रत्न.
अपडेट्स मेलवर मिळवण्यासाठी साइन अप करा
आपला ईमेल प्रविष्ट करा आणि नवीन अपडेट्स थेट मेलवर मिळवा.
जर तुम्ही तुमचा ईमेल आधीच सबमिट केला असेल तर तो बंद करा.