Skip to content
ज्योतिष रत्न अभ्यासक्रम सम्पूर्ण माहिती

💢 प्रबंधाच्या सूचना 💢

या परीक्षेच्या अभ्यासक्रमात 50 कुंडल्यांच्या प्रबंधाचा समावेश आहे.  परीक्षेचे मूल्यांकन, लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा व प्रबंध यावर अवलंबून असल्यामुळे,परीक्षार्थीना प्रत्यक्ष परीक्षेस येण्यापूर्वी, सर्वं बाबतीत परिपूर्ण प्रबंध तयार करून, तो सादर करणे अनिवार्य आहे.

💢 खाली दर्शविलेल्या 7 विषयापैकी कोणतेहि 5 विषय आपण प्रबंधसाठी निवडू शकता.

🔼 नेमलेले विषय

  1. कोर्ट केस – ज्या जातक / जातिकेने कोणत्याहि कारणास्तव कोर्ट केस केली असेल, वा त्यांच्यावर कोर्ट केस झाली असेल अशा कुंडल्या, या विषयास पात्र ठरतील. मात्र पत्रिकेतील ग्रहयोग व त्यांच्या जीवनात येणारी ही घटना याचे ज्यो. शास्त्रीय दृष्ट्या विवेचन करणे आवश्यक आहे. त्यात त्यांचा विजय /पराजय झाला असेल तर तेही, ग्रहाच्या माध्यमातून विषद करता आले पाहिजे.

हा विषय निवडल्यास याबाबत 10 कुंडल्यांचे विवेचन करावे लागेल.

  1. नि :संतान योग – काही दुर्दैवी जातक /जातिका असेही आढळतात की, संपूर्ण उमेदीचे आयुष्य निघून गेल्यावरहि त्यांना संतान प्राप्ती होत नाही. ही समस्या का निर्माण झाली? याचे ग्रहयोगाच्या माध्यमातून विश्लेषण करावे लागेल. हा विषय निवडल्यास 10 कुंडल्यांचे विश्लेषण आवश्यक आहे. ( पती -पत्नी दोघांच्याही कुंडल्या असल्यास, प्रत्येक कुंडलीचे स्वतंत्र विवेचन असावे. प्रत्येक कुंडलीस स्वतंत्र क्रमांक द्यावा. संदर्भ देताना एका कुंडलीत त्याच्या जोडीदाराच्या कुंडली क्रमांकचा उल्लेख करावा ) पतिपत्नी असले तरी दोन्ही कुंडल्यांची विवेचने वेगवेगळी असावी. म्हणजे त्या 2 कुंडल्या समजल्या जातील.

  2. परित्यक्ता योग – ( घटस्फोट झाला नाही परंतु ज्या कायम विभक्त राहतात अशा जातिका)

अशा 10 कुंडल्याचे, ग्रहस्थितीनुसार विवेचन करावे लागेल. काही पुरुष जातक असेहि असू शकतात. की त्यांनी घटस्फ़ोट घेतला नाही पण, ते एकत्र राहत नाहीत, त्यांच्या कुंडल्या या वर्गवारीत मोडतात. अशी स्थिती कोणत्या ग्रहयोगामुळे निर्माण झाली? ते या कुंडल्यांच्या माध्यमातून विषद करावे लागेल.

  1. ऑपेरेशन योग – एखाद्या व्यक्तीचे एखाद्या आजारात वा अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागते. अशा 10 व्यक्तींच्या कुंडल्यांचे विवेचन, कोणत्या ग्रहस्थितीमुळे ही शस्त्रक्रिया करावी लागली? याच्या विश्लेषणासह करावयाचे आहे.

  2. त्वचाविकार -बऱ्याचशा व्यक्ती कोड, कुष्ठ, इसबगोल, गजकर्ण, श्वेतकुष्ठ, सोरायसिस अशा आजाराने त्रस्त असतात. तो आजार त्यांना कोणत्या ग्रहस्थितीमुळे झाला? याच्या विश्लेषणासहीत, 10 कुंडल्या सादर करावयाच्या आहेत.

6 अविवाहित व्यक्ती – अशा पुरुष /स्त्री की ज्यांचा विवाहच झाला नाही. ज्योतिषीय कारणांसह, अशा 10 कुंडल्या सादर कराव्या लागतील.

  1. घटस्फोटीता /घटस्फ़ोटीत –  अशा व्यक्तीच्या 10 कुंडल्या ज्यात घटस्फोटास कोणती ग्रहस्थिती कारणीभूत झाली? याचे समर्पक विश्लेषण असावे.

🔼 वरील 7 पैकी कोणतेहि 5 विषय निवडावेत व 5×10=50 कुंडल्यांचा प्रबंध तयार करावा.

🔼 कोणत्याहि नामांकित व्यक्तीची कुंडली घेऊ नये.