Skip to content

ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त

श्री ज्योतिष संशोधन केंद्र, जळगाव आयोजित*

अभिजीत प्रतिष्ठान द इन्स्टिट्यूट ऑफ डेस्टिनी मॅनेजमेंट, मुंबई
आणि
द लीला टॅरो, पुणे
प्रायोजित

ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन  ( वर्ष तिसरे)

दि. ११ व १२ जून २०२३
द प्रेसिडेंट हॉटेल, प्रभात रोड, पुणे

ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांसाठी
संशोधनाची सुवर्णसंधी

आपण ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक किंवा ज्योतिष प्रेमी असाल तर आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आलो आहोत, ज्योतिष संशोधनाची एक सुवर्णसंधी. जळगावच्या श्री ज्योतिष संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित करीत आहोत, “तिसरे ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन”. ज्ञान, संशोधन, चर्चा, तज्ञांचे मार्गदर्शन आणि पारितोषिके देऊन गुणवंत अभ्यासक, विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान आणि बरेच काही…

या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी घेणार आहोत ज्योतिष अलंकार आणि ज्योतिष विद्यावाचस्पती परीक्षा.

अभ्यासकांना मिळणार आहे आजवर प्राप्त केलेले ज्ञान व्यक्त करण्याची संधी.

सहभागी विद्यार्थ्यांना करता येईल शास्त्रशुध्द चर्चा व नोंदता येतील निरीक्षणे आणि निष्कर्ष.

गट चर्चा, विषय मांडण्याची संधी आणि उत्तम सादरीकरणाला मिळेल पारितोषिके.

आपण मांडलेले विचार, काढलेल्या निष्कर्षांवर तज्ञांचे बहुमोल मार्गदर्शन.

प्रत्येक विद्यार्थ्याला मिळेल प्रत्यक्ष सहभाग घेण्याची संधी.

चला तर मग अभ्यासाला लागा, संशोधनाच्या कार्यशाळेत सहभाग नोंदवा.

कृतीशील अभ्यासाला देऊ या संशोधनाची जोड. एक परिपूर्ण ज्योतिषी होण्याच्या दिशेने आपले पहिले पाऊल उचला.

या अधिवेनशात सहभागी होण्यासाठी आधी नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

नावनोंदणी फी – १,८०० रुपये मात्र

विशेष सवलत – २० मार्च २०२३ या तारखेपूर्वी नावनोंदणी केल्यास फी – १,४०० रुपये मात्र.

विशेष सवलत – २० एप्रिल २०२३ या तारखेपूर्वी नावनोंदणी केल्यास फी – १,६०० रुपये मात्र.

अधिवेशन विशेष प्रतिनिधी
अधिवेशनात विशेष प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्यासाठी ४१००/- रुपये शुल्क आहे. या शुल्कात सन्मानचिन्ह, शाल, बुके व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येईल. यांची आसन व्यवस्था पहिल्या चार रांगेत केली जाईल.

स्वागत सदस्य समिती
या समितीत सदस्य म्हणून सहभागी होण्यासाठी २५००/- रुपये शुल्क आहे. या शुल्कात सन्मानचिन्ह, शाल, बुके व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येईल. त्यांची आसन व व्यवस्था पाचव्या व सहाव्या रांगेत असेल.

(महत्त्वाचे – अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आधी नावनोंदणी करणे आवश्यक राहिल. अधिवेशनात सहभागी सर्वांना एक वेलकम किट दिले जाईल. तसेच चहा, नाष्टा, दुपारचे भोजन, हाय टी, नाष्टा यांचा त्यात समावेश राहिल.)

G pay or phone pay 9850098688 या मोबाईल नंबरवर करून याच नंबरवर स्क्रीनशॉट टाकावा

धन्यवाद!
शुभं भवतु!
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी
श्री ज्योतिष संशोधन केंद्र, जळगाव