Skip to content

शुक्रवार, १७ जून २०२२

राशीभविष्य

 

**शुक्रवार, १७ जून २०२२*

{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद}

*मेष*
आजचा आपला दिवस हा कर्तव्याला प्राधान्य देणारा असेल.आज संपूर्ण दिवस कामात मग्न राहाल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.

*वृषभ*
आजच्या दिवशी भाग्य, सुख, आनंद यांची प्राप्ती कराल. काही धार्मिक संस्थांना मदत करण्यात पुढाकार घ्याल. ज्येष्ठांचे आशीर्वाद प्राप्त कराल.

*मिथुन*
आजचा आपला दिवस काहीसा खडतर, चिंतातूर, तणावयुक्त जाऊ शकतो. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. आपल्या नित्य कामावर लक्ष केंद्रित करा.

*कर्क*
आजच्या दिवशी उत्तम दाम्पत्य जीवनाचा अनुभव घ्याल. व्यवसायात आज सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न कराल. कोणताही निर्णय घेताना जोडीदाराचे मत विचारात घ्या.

*सिंह*
आजच्या दिवशी शारीरिक, मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रकृतीच्या काही तक्रारी जाणवतील. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

*कन्या*
आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहवर्धक असेल. आज उत्तम संततीसौख्य लाभेल. संततीसोबत आजचा दिवस खेळीमेळीने पार पाडाल.

*तुळ*
आजचा दिवस आपणासाठी सौख्याने परिपूर्ण असेल. आज गृहसजावटीडे लक्ष द्याल. आज घरातील आपला वावर घरातील वातावरण चैतन्यमय करून टाकेल.

*वृश्चिक*
आजचा आपला दिवस हा धाडस, शौर्य व पराक्रमाचा असेल. इतक्या दिवसांपासून आपण घेत असलेल्या मेहनतीच्या बळावर आज लाभप्राप्ती करून घ्याल.

*धनु*
आजच्या दिवशी आपण कौटुंबिक सौख्याचा आस्वाद घ्याल. आज कुटुंबियांना जास्त वेळ द्याल. काही महत्त्वाचे आर्थिक व्यवहारही आज पार पाडाल.

*मकर*
आजचा दिवस हा आपलाच आहे. आज मन अतिशय प्रसन्न राहील. आज स्वतःसाठी वेळ काढाल. काही महत्त्वाची कामे आज पूर्ण कराल.

*कुंभ*
आजचा दिवस आपल्यासाठी काहीसा त्रासदायक जाऊ शकतो. आरोग्याच्या काही समस्या सतावतील. त्यावर लक्ष देणे क्रमप्राप्त आहे.

*मीन*
आजच्या दिवशी आपणास लाभप्राप्ती, इच्छापूर्ती संभवते. काही प्रिय व्यक्तींशी वार्तालाप आज होऊ शकतो, त्यामुळे मन सुखावून जाईल.