Skip to content

शनिवार, ०२ एप्रिल २०२२

राशीभविष्य

 

शनिवार, ०२ एप्रिल २०२२

{ आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }

मेष
आजची सकाळ आपणासाठी नवसंजीवनी, नव ऊर्जा घेऊन येणार आहे. या नव ऊर्जेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करून त्याचा जास्तीत जास्त लाभ करून घ्या. काही नवीन संकल्पना, नवीन योजना यांची आखणी कराल.

वृषभ
आजचा आपला दिवस आनंद प्रसन्नता यांनी युक्त असेल. आज अचानक लाभाची प्राप्ती संभवते. आज सर्व कार्य आपल्या इच्छेनुसार घडतील. काही मित्रमंडळींच्या गाठीभेटी देखील संभवतात.

मिथुन
आज आपल्या कार्यक्षेत्राला एक वेगळीच गती प्राप्त होईल. आज आपले सहकर्मी आपल्या कामाचे कौतुक करतील. वरिष्ठ देखील आपल्या कर्तुत्वाने आनंदी होतील.

कर्क
आपण घेत असलेल्या निरंतर प्रयत्न आणि मेहनत यातून आज आपणास भाग्याची प्राप्ती होईल. काही धार्मिक कार्यात आज आपला वेळ व्यतीत कराल. आज घरात मंगलदायी आणि आनंदमय वातावरण असेल.

सिंह
आज आपण आपल्या खंबीर स्वभावानुसार सर्व अडी – अडचणींवर मात करून आपले इच्छित ध्येय साध्य कराल. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तीं बरोबर चर्चा करून आपल्याला काही नवीन कल्पना आणि योजना सुचतील.

कन्या
आजच्या दिवशी आपला उत्साह, आपली उर्जा सकारात्मक कामे करण्यासाठी वापराल. खेळीमेळीने आपले सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहाल. आज स्वतःसाठी वेळ काढून आपल्या व्यक्तित्वाचे आकलन कराल.

तुळ
आजचा दिवस आपल्या जोडीदाराच्या साथीने आनंदात व्यतीत कराल. आपल्या प्रिय व्यक्तींच्या सहवासात आजचा आपला बराच वेळ व्यतीत होईल. जोडीदारासमवेत आजची संध्याकाळ मजेत व्यतीत कराल.

वृश्चिक
आज आपल्या कामाच्या व्यापातही आपली ऊर्जा, आपला उत्साह टिकवून ठेवाल. आपल्या नोकरीच्या ठिकाणी आज आकर्षणाचे बिंदु ठराल. आपले काम आज वेळेच्या आधीच पूर्ण कराल.

धनु
आज मनोवांछित इच्छा प्राप्तीचा लाभ होईल. आज आपले छंद, कलागुण, आवडीनिवडी यांच्यासाठी वेळ काढाल. प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटीने आज सुखावून जाल.

मकर
आजच्या दिवशी उत्तम गृहसौख्याचा लाभ मिळेल. काही गृहोपयोगी वस्तू किंवा दागदागिन्यांची खरेदी संभवते. आजचा दिवस घरातील व्यक्तींना समवेत उत्साहात घालवाल. काही पै – पाहुण्यांचे आगमन संभवते.

कुंभ
आजच्या दिवशी आपल्यातील योग्यता, क्षमता, पात्रता ओळखून काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्याल. काही वंदनीय व्यक्तींचे मार्गदर्शन आज लाभेल. आज आपल्या कामाप्रती दक्ष असाल.

मीन
आजचा दिवस कुटुंबीयांसमवेत आनंदात, उत्साहात साजरा कराल. कुटुंबीयांना त्यांच्या मनाजोगता वेळ द्याल. कुटुंबीयांसमवेत आजचा दिवस खेळीमेळीच्या वातावरणात घालवाल.