Skip to content

शनिवार, १९ मार्च २०२२

राशीभविष्य

 

शनिवार, १९ मार्च २०२२

{ आजचे ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }


मेष
आज काहीसा मानसिक, शारीरिक थकवा जाणवेल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक राहील. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काही हितशत्रूंचा त्रास संभवतो. कोणावरही अति विश्वास ठेवू नये.

वृषभ
आजचा आपला दिवस उत्साहवर्धक असेल. आपल्या आवडीनिवडी, कला, छंद यांची जोपासना कराल. आज स्वत:साठी वेळ काढाल. आज आपल्या मुलांनाही उत्तम वेळ द्याल.

मिथुन
आज घरातच रममाण व्हाल. उत्तम गृहसौख्याची अनुभूती आज मिळेल. घरातील ज्येष्ठांची सेवा कराल. घरातील काही अडकलेली कामे मार्गी लावाल.काही पाहुण्यांचे आगमन संभवते.

कर्क
आज अनेक अडचणी, अडथळ्यांचा सामना करून अपेक्षित ध्येयाची प्राप्ती कराल. काही धाडसी निर्णय घ्याल. त्यात भाग्याचीही साथ लाभेल. आरोग्याची मात्र काळजी घ्यावी.

सिंह
आज कुटुंबीयांसमवेत रममाण व्हाल. त्यांना मनाजोगता वेळ द्याल. काही आर्थिक व्यवहार आज पूर्ण कराल. त्यात कुटुंबियांचे मतही विचारात घ्याल. काही सुग्रास भोजनाचा बेत संभवतो.

कन्या
आजचा आपला दिवस आनंद,उत्साह,स्फूर्ती यांनी युक्त असेल. बऱ्याच दिवसांपासून मनात असलेल्या काही इच्छा आज पूर्ण होतील. आज स्वतःसाठी वेळ काढाल. आजच्या सुंदर दिवसाचा योग्य उपयोग करा.

तुळ
आजचा आपला दिवस तणावग्रस्त, चिंताग्रस्त जाईल. काही अनावश्यक काळजी, चिंता सतावतील. खर्चाचा योग्य ताळमेळ साधावा लागेल. अविचाराने कोणतीही कृती करू नका.

वृश्चिक
आजच्या दिवशी अनेक दिवसांपासून मनात असलेल्या इच्छा, अपेक्षांची पूर्ती होईल. प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटी संभवतात. आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल.

धनु
आज आपण आपल्या कामाप्रती अधिक जागरूक राहाल. काही महत्वाची कामे मार्गी लावाल. आज वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपल्या कामातून आज कर्तव्यपुर्तीचा आनंद घ्याल.

मकर
आज इतक्या दिवसांच्या मेहनतीनंतर भाग्याची प्राप्ती होईल. काही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य लाभेल.काही प्रवास संभवतात.

कुंभ
आज अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काहीशी मानसिक अस्वस्थता जाणवेल. मात्र निराश न होता आपल्या नित्य कर्मावर लक्ष केंद्रित करा.

मीन
आज वैवाहिक जोडीदारासमवेत अमूल्य वेळ व्यतीत कराल.जोडीदाराचे उत्तम प्रेम व सहकार्य मिळेल. आपणही जोडीदाराच्या भावभावना समजून घ्याल. व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने काही नवीन कल्पनांचा अवलंब कराल.