Skip to content

बुधवार, २७ ऑगस्ट २०२५

राशिफल

बुधवार, २७ ऑगस्ट २०२५

*मेष*
आज काहीसे प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. काही मानसिक अस्थिरता जाणवू शकते. प्रतिस्पर्धी, हितशत्रू यांचा त्रास संभवू शकतो. आज केवळ आपल्या नित्य कामावर लक्ष केंद्रित करावे.

*वृषभ*
आजचा दिवस उत्साहवर्धक असेल. काही नवीन संकल्पना,योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील राहाल. मुलांसमवेत वेळ आनंदात जाईल.

*मिथुन*
आज उत्तम गृहसौख्याची प्राप्ति होईल. घरातील काही महत्वपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. वाहन वास्तू सौख्याची प्राप्ति कराल.

*कर्क*
आज आपल्या बुद्धीचातुर्याने काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल. नोकरी व्यवसाया निमित्त काही प्रवास संभवतात. काही धाडसी, साहसी कामे आज पूर्ण कराल.

*सिंह*
आज पारिवारिक सुखाचा आस्वाद घ्याल. काही सहलींचे कार्यक्रम बनवाल. स्वादिष्ट भोजनाचा लाभ होईल. घरातील वातावरण प्रसन्न असेल.

*कन्या*
आज दुपारनंतर बऱ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतील. सर्व अडचणी,बाधा दूर होऊन लाभदायक दिवस जाईल. आनंद, उत्साह,नवीन ऊर्जा जाणवेल.

*तुळ*
अचानक काही अशांती, असमाधान जाणवेल. आपले म्हणणे लोकांना पटवून देण्यात असमर्थता वाटेल. काही भौतिक गोष्टींवर खर्च संभवतात. काही जोखमीच्या बाबी टाळाव्यात.

*वृश्चिक*
इतक्या दिवसांपासून आपण घेत असलेल्या मेहनतीचे, कष्टांचे शुभ फळ आज प्राप्त होईल. विद्वान, जाणकार व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. काही भेट, उपहार प्राप्त होतील.

*धनु*
आज आपल्या कार्यक्षेत्रात काही नवीन कार्यप्रणालीचा अवलंब कराल. सामाजिक कार्यात सफलता मिळेल. मान सन्मान प्राप्त होतील. आपले काम चोख, प्रामाणिकपणे पार पाडाल.

*मकर*
आज भाग्याची, सौख्याची प्राप्ति कराल. काही प्रवासाचे योग संभवतात. काही धार्मिक, अध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल. गुरुजनांचे आशीर्वाद प्राप्त कराल.

*कुंभ*
आज काही चिंता, तणाव सतावतील. काही कामात विघ्न निर्माण होईल. वाईट संगतीपासून स्वतःला दूर ठेवा. अनावश्यक गोष्टींपासून वेळ वाया घालवू नका.

*मीन*
आज दांपत्य जीवनाचा आनंद घ्याल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. आपणही जोडीदाराला भरभरून प्रेम द्याल. व्यापार व्यवसायात इच्छित लाभ होतील.