Skip to content

गुरुवार, ३१ जुलै २०२५

राशिफल

गुरुवार, ३१ जुलै २०२५

*मेष*
आज व्यापारी, व्यावसायिकांसाठी उत्तम दिवस असेल. व्यवसायात नवनवीन संधी प्राप्त होतील. वैवाहिक जोडीदाराचेही आज सहकार्य लाभेल.

*वृषभ*
आजचा दिवस काहीसा काळजी, चिंता यांनी युक्त असेल. आरोग्यही काहीसे अस्वस्थ राहीलं. प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

*मिथुन*
आज आपल्यातील कलागुण, आवडीनिवडी, छंद यांना प्रोत्साहन मिळेल. नविन कलाविष्कार सादर कराल. आजचा संपूर्ण दिवस उत्साहाचा, आनंदाचा असेल.

*कर्क*
आजच्या दिवशी गृहसौख्याचा आनंद घ्याल. घरातील खूप दिवसांपासून अपूर्ण वा दुर्लक्षित राहिलेली कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आज प्रयत्नशील राहाल.

*सिंह*
आजचा आपला दिवस पराक्रमातून लाभप्राप्तीचा आहे. आपली क्षमता, योग्यता, पात्रता यांचा योग्य वापर करून आज कार्यसिद्धी कराल. छोटे-मोठे प्रवास संभवतात.

*कन्या*
आज कुटुंबीयांना वेळ द्याल. कुटुंबीयांच्या इच्छेप्रमाणे वर्तन कराल. काही महत्त्वाची कामे हातावेगळी करताना कुटुंबाचे मत विचारात घ्याल.

*तुळ*
आजचा दिवस आपल्यासाठी नविन ऊर्जा व अभूतपूर्व उत्साह यांनी भरलेला असेल. आजच्या या सुंदर दिवसाचा लाभ करून घ्यावा.

*वृश्चिक*
आजचा दिवस काहीसा तणावयुक्त असेल. आज मानसिक अस्थिरता जाणवेल. त्यामुळे आज कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय घेणे टाळावेत.

*धनु*
आज अनेक अडचणी, अडथळ्यांवर मात करून लाभाची, आनंदाची प्राप्ती कराल. काही सरकारी कामे मार्गी लावाल. भाग्याची साथ लाभेल.

*मकर*
आज आपले संपूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रित राहीलं. आज हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील राहाल. कामे भरपूर मात्र वेळ मर्यादित अशी काहीशी अवस्था होईल.

*कुंभ*
गेल्या अनेक दिवसांपासून आपण घेत असलेल्या मेहनतीचे, परिश्रमाचे आज चीज होईल. अनपेक्षितपणे काही चांगली बातमी मिळेल. काही मित्रमंडळींसमवेत प्रवासाचे योग संभवतात.

*मीन*
आजच्या दिवशी अनेक अडचणी, अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. आपल्या रागावर, वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहीलं.