यंत्रशास्त्र कार्यशाळा

🌟 श्री ज्योतिष संशोधन केंद्र आयोजित – यंत्रशास्त्र कार्यशाळा 🌟
प्रिय ज्योतिष अभ्यासक मित्रांनो,
ज्योतिषशास्त्र हे केवळ ग्रह-तार्यांचे गणित नसून, त्यामध्ये यंत्र, मंत्र आणि तंत्र यांचा सुंदर संगम आहे. यंत्रशास्त्र हा या संपूर्ण शास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी भाग आहे.
✅ यंत्रशास्त्राचे महत्त्व:
राशी, पत्रिका, ग्रह स्थिती आणि गोचर यानुसार योग्य यंत्र तयार करणे, ते शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रतिष्ठापित करणे आणि मंत्रोच्चाराद्वारे त्यांना जागृत करणे ही एक गूढ आणि परिणामकारक प्रक्रिया आहे. योग्य यंत्राची स्थापना केल्याने जीवनातील अडथळे, आर्थिक अडचणी, वैवाहिक तणाव, आरोग्य समस्या आणि इतर अनेक संकटांवर प्रभावी उपाय मिळू शकतो. यंत्रशास्त्र हे प्रत्येक ज्योतिष अभ्यासकाला आवर्जून आत्मसात करायलाच हवे, याच उद्देशाने श्री ज्योतिष संशोधन केंद्र घेऊन आले आहे –
🔶 चार दिवसांची विशेष यंत्रशास्त्र कार्यशाळा 🔶

कार्यशाळेचा अभ्यासक्रम
दिवस १: १ ऑगस्ट २०२५
- यंत्र म्हणजे काय ?
- यंत्र कसे कार्य करतात ?
- यंत्रासाठी आवश्यक ज्ञान ?
- यंत्राची उत्पती (विविध आकार, प्रकार)
- यंत्राचे संसारिक आयुष्यातील महत्व
- कोणत्या यंत्राची पूजा आपल्यासाठी लाभदायक
दिवस २: २ ऑगस्ट २०२५
- यंत्रासाठी आवश्यक साहित्य (पेपर,कलम,शाही)
- यंत्र निर्माण साठी मुहूर्त
- यंत्र निर्माण साठी आसन व शुभ दिशा
- यंत्रासाठी अनुकूल देवता कोणकोणते ?
- नवग्रह यंत्र लिखाण (अंक, मंत्र)
- यंत्र प्रतिष्ठापनेची योग्य पद्धत
दिवस ३: ३ ऑगस्ट २०२५
- विविध कार्यासाठी यंत्र निर्माण (पद्धती, नियम )
- यंत्र वापरण्याची दिशा व पद्धत
- राशीनुसार यंत्राची निवड कशी करावी ?
- ज्योतिषीय उपाय म्हणून यंत्र निर्माण व सिद्ध करण्याचे तंत्र
- स्वतः साठी सुरक्षा उपाय
- यंत्र साधना
🎁 बोनस: सर्व सहभागी विद्यार्थ्यांना एक स्वताच्या कुंडलीचा यांत्रिक उपाय
अधिक माहितीसाठी
🌼 कार्यशाळेमध्ये काय शिकाल?
- राशीनुसार यंत्राची निवड कशी करावी?
- पत्रिकेतील ग्रहस्थितीवर आधारित यंत्राचे महत्त्व
- यंत्र तयार करण्याची शास्त्रीय प्रक्रिया
- यंत्र प्रतिष्ठापनेची योग्य पद्धत
- मंत्रसिद्धी व जागृती प्रक्रिया
- यंत्रांच्या माध्यमातून विशिष्ट समस्यांवर उपाय योजना
- वास्तविक जीवनातील केस स्टडीज आणि प्रॅक्टिकल डेमो
✅ कोण सहभागी होऊ शकतात?
- व्यावसायिक ज्योतिष
- ज्योतिष शिकणारे विद्यार्थी
- ज्योतिषामध्ये विशेष प्राविण्य मिळवू इच्छिणारे
- जिज्ञासू
👨🏫 प्रशिक्षक
ज्योतिर्विद श्री प्रवीण पाटील
(प्रसिद्ध ज्योतिष तज्ज्ञ आणि यंत्रशास्त्र विशारद)