Skip to content

शुक्रवार, ३० मे २०२५

राशिफल

शुक्रवार, ३० मे २०२५

*मेष*
आज भावंडांशी काही मतभेद होणार नाही याची काळजी घ्या. काही महत्त्वाचे निर्णय घेताना पुनश्च एकदा विचार अवश्य करा.

*वृषभ*
आज कुटुंबीयांचे उत्तम सहकार्य प्राप्त होईल. काही महत्वपूर्ण आर्थिक व्यवहार आज पूर्ण कराल. त्यात घरातील सदस्यांचे मत विचारात घ्या.

*मिथुन*
आजचा दिवस आपलाच आहे. बऱ्याच दिवसांपासून मनात असलेली कामे आज पूर्ण कराल. आजच्या सुंदर दिवसाचा आवश्य लाभ करून घ्या.

*कर्क*
आज काही मनस्तापदर्शक प्रसंग घडू शकतात. पण आपला तोल ढळू देऊ नका. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. संततीवर खर्च संभवतात.

*सिंह*
आजचा दिवस लाभ प्राप्तीचा असेल. मित्र मंडळींमध्ये रममाण व्हाल. आज आपल्यातील कलागुणांना योग्य वाव मिळेल.

*कन्या*
आज कर्तव्यपूर्ती करताना काही धाडसी निर्णय घ्याल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपल्या कामातच आज आनंद शोधण्याचा प्रयत्न कराल.

*तुळ*
आजचा दिवस आपणासाठी उत्साहाचा, आनंदाचा असेल. गुरुतुल्य व्यक्तींचा सहवास लाभेल. त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील. काही प्रवास संभवतात.

*वृश्चिक*
आजचा दिवस काहीसा मनस्तापाचा असेल. काही मनाविरुद्ध गोष्टी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिडचिड, दगदग संभवते.

*धनु*
आजच्या दिवशी व्यवसाय वृद्धीसाठी काही खर्च संभवतात. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.

*मकर*
आज काहीसे प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. त्यामुळे काही ठरवलेली कामे करण्यात अडसर येऊ शकतो. यामुळे काहीसे मानसिक दडपण येईल. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

*कुंभ*
आज आपले छंद, आवडी निवडी जोपासण्यासाठी प्रयत्नशील राहाल. आज आपल्या मुलांना जास्त वेळ द्याल. त्यांच्यासोबत वेळ मजेत,आनंदात व्यतित कराल.

*मीन*
आज घरात कुटुंबीयांसमवेत आनंदात वेळ घालवाल. त्यांच्या सहकार्याने आज घरातील काही महत्त्वाची कामे पूर्णत्वास न्याल.