Skip to content

गुरूवार, ०७ नोव्हेंबर २०२४

राशिफल

गुरूवार, ०७ नोव्हेंबर २०२४

{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }

मेष
आजचा आपला दिवस भाग्यप्राप्ती, सौख्यप्राप्तीचा असेल. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या काही इच्छांची पूर्तता आज होईल. त्यामुळे आनंदाने सुखावून जाल.

वृषभ
आजच्या दिवशी काही त्रासदायक, क्लेशदायक गोष्टी घडू शकतात. प्रकृती व मनस्थिती दोन्हीही अस्थिर राहू शकते. विनाकारण वाद-विवाद, कटकट यासारखे प्रसंग टाळा.

मिथुन
आजच्या दिवशी जोडीदाराशी स्नेहाचे, सौख्याचे, सलोख्याचे संबंध प्रस्थापित होतील. उभयतांमधील प्रेम वृद्धिंगत होईल. आजच्या दिवशी सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न कराल.

कर्क
आजचा दिवस काहीसा असमाधानकारक जाऊ शकतो. प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. आपल्यातील योग्यता, क्षमता, कर्तुत्व यांची योग्य दखल आज घेतली जाणार नाही.

सिंह
आजचा दिवस आपणासाठी उत्साहाचा, आनंदाचा असेल. आपल्यातील सुप्त कलागुणांना आज वाव मिळेल. त्यातून सौख्याची प्राप्ती होईल. संतती समवेत आजचा दिवस मजेत जाईल.

कन्या
आजच्या दिवशी उत्तम गृहसौख्याचा आनंद घ्याल. आज आपले घर स्वच्छ, टापटीप, नीटनेटके ठेवण्यामध्ये कल राहील. कुटुंबातील सदस्यांचे उत्तम सहकार्य आज मिळेल.

तुळ
आज आपल्या बुद्धीचातुर्याचा वापर करून काही महत्त्वाची कामे मार्गी लावाल. आज आपल्या आवडीनिवडी जोपासण्यासाठी देखील वेळ काढाल. कामानिमित्त प्रवासाचे योग संभवतात.

वृश्चिक
आज पारिवारिक कारणांसाठी बाहेर जाण्याचे योग संभवतात. कुटुंबीयांचे उत्तम सहकार्य आज लाभेल. कुटुंबीयांसाठी काही खर्च देखील संभवतात.

धनु
आजचा दिवस आपणासाठी उत्तम असणार आहे. आपल्यातील उत्साहाचा, कर्तुत्वाचा प्रभाव इतरांवर पाडाल. आज आपल्या धाडसी व नेतृत्वगुणी स्वभावाने अनेक समस्यांना सहज पार कराल.

मकर
आजच्या दिवशी मनाविरुद्ध काही गोष्टी घडण्याची शक्यता असेल. त्यामुळे आजच्या दिवशी मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. केवळ आपल्या नित्य कर्मावर लक्ष केंद्रित करा.

कुंभ
इतक्या दिवसांपासून घेत असलेल्या मेहनतीची शुभ फले आज प्राप्त होतील. आपल्यातील कलागुणांनी लोकांवर आपली सकारात्मक छाप आज सोडाल आणि मानसन्मान व कीर्ती प्राप्त कराल.

मीन
आज आपल्या मूळ धाडसी व मेहनती स्वभावाला अनुसरून केवळ कर्माला प्राधान्य द्याल. आपल्या कामासोबतच आपल्या कुटुंबियांना देखील वेळ द्याल.