Skip to content

०१ ते ०७ सप्टेंबर २०२४

राशिफल

०१ ते ०७ सप्टेंबर २०२४

{ आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }

मेष
सप्ताहाची सुरुवात अतिशय सुंदर असेल. नवीन उत्साह, उर्जा जाणवेल. आपल्या कार्यक्षेत्रात काही तरी नवीन करून दाखविण्याची जिद्द असेल. त्यानुसार योग्य ती पावले देखील उचलाल. मात्र काही स्पर्धक हितशत्रू त्रास देऊ शकतात. त्यांवर बारकाईने लक्ष द्यावे लागू शकते. सप्ताहाच्या अखेरीस काहीसा तणाव जाणवेल. अचानक घरातील काही जबाबदार्‍या वाढतील. मात्र घरातील सदस्यांची योग्य साथ मिळेल.

वृषभ
हा सप्ताह आपणासाठी सर्वसामान्य असेल. घरातील काही महत्त्वाची व बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित राहिलेली कामे या सप्ताहात पूर्ण कराल. काही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना कुटुंबियांचे मत देखील विचारात घ्याल. आपल्या उत्साही व प्रसन्न व्यक्तिमत्त्वाने व नावीन्यपूर्ण दृष्टिकोनाने इतरांची मने जिंकून घ्याल. कुटुंबीयांच्या आरोग्याचे काहीशी काळजी घ्यावी लागेल. कार्यक्षेत्रातील स्पर्धेमुळे दगदग, धावपळ वाढेल. कामाचे योग्य वेळापत्रक व नियोजन करणे आवश्यक राहील.

मिथुन
या सप्ताहाची सुरुवातच धडाकेबाज राहील. काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्याल. मात्र आपल्या आत्मविश्वासाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणेही आवश्‍यक राहील. त्यासाठी काही ज्येष्ठ, तज्ञ व्यक्तींबरोबर चर्चेतून नव्या योजना व कल्पना सुचतील. गृहपयोगी काही वस्तूंची खरेदी कराल. संततीकडे, घराकडे विशेष लक्ष द्याल. छोट्या छोट्या कारणांनी जोडीदार नाराज होणार नाही ना याची काळजी घ्या. जोडीदाराच्या भावना समजून घ्या.

कर्क
हा सप्ताह आपणासाठी उत्तम असेल. कुटुंबीयांसमवेत अमूल्य वेळ व्यतीत कराल. कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकाराल. कामाचा अतिरिक्त ताण जाणवेल. परंतु आपल्या कार्यक्षेत्रात ऊर्जा जाणवेल. घरातील काही महत्त्वाची कामे पूर्णत्वास न्याल. काही सामाजिक कार्यातही सहभागी व्हाल. आपल्या कला, छंद, आवडीनिवडी यांच्यासाठी वेळ काढाल. स्वतःवर जास्त खर्च होतील. चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.

सिंह
हा सप्ताह आपणासाठी अतिशय उत्तम असेल. एक नवीन ऊर्जा, उत्साह, उमेद यांचा अनुभव घ्याल. उत्तम कौटुंबिक सौख्य, गृहसौख्य लाभेल. कुटुंबीयांची उत्तम साथ, सहकार्य मिळेल. गृहसजावटीच्या काही वस्तूंची खरेदी या सप्ताहात संभवते. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्याल व त्यांचे आशीर्वाद देखील प्राप्त कराल. संतती मनाप्रमाणे वागेल. तसेच आपल्या आज्ञेत राहील. खूप दिवसांपासून मनात असलेल्या काही इच्छांची पूर्तता या सप्ताहात संभवते.

कन्या
सप्ताहाची सुरुवात काहीशी चिंतायुक्त, कष्टप्रद असेल. काही शारीरिक, मानसिक त्रास संभवतात. मात्र या सर्वांवर मात करून आपण पुन्हा नवीन उत्साहाने, जोमाने संपूर्ण सप्ताह आनंदात व्यतीत कराल. आपल्या कामाप्रती, कर्तव्याप्रती दक्ष राहून चोखपणे आपले काम पार पाडाल. घरासाठी काही खर्च संभवतात. जोडीदाराशी सामंजस्याने, प्रेमाने वागाल.

तुळ
हा सप्ताह आपणासाठी चांगला असेल. सप्ताहाच्या सुरुवातीसच भाग्याची, नशिबाची साथ मिळेल. त्यामुळे आपली बरीचशी अडकलेली कामे मार्गी लागतील. काही ज्येष्ठ, गुरुतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन देखील लाभेल. आपल्या कर्तव्याप्रती देखील आपण अधिक सजग राहाल. नोकरदार मंडळींना आपल्या कामात यश प्राप्त होईल. आपण कर्तव्यपूर्तीचा आनंद घ्याल. आपली कामे करण्याची पद्धतीही लोकांना आवडेल. त्यामुळे आपली प्रतिमा उंचावेल. सप्ताहाच्या उत्तरार्धात आपल्या कष्टाचे, मेहनतीचे योग्य फळ आपणास मिळेल. आपण कधी अपेक्षाही केलेली नसेल, असे आपले विरोधक देखील आपली प्रशंसा करतील. मात्र स्तुतीने भारावून न जाता वास्तविकतेचे भान ठेवणे देखील आवश्यक राहीलं. अन्यथा अति उत्साहात, आनंदात काही चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून सावधगिरी बाळगावी. अनावश्यक, अवास्तव खर्च टाळावेत. मन आणि बुद्धी शांत व स्थिर ठेवावी.

वृश्चिक
हा सप्ताह आपणासाठी सर्व साधारण असेल. काही अनपेक्षित लाभाची, आनंदाची, सौख्याची प्राप्ती संभवते. मित्रमंडळीं समवेत सप्ताहाची सुरुवात मजेत होईल. आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल. सप्ताहाच्या मध्यात काही तणावदर्शक प्रसंग उभे राहू शकतात. तर अचानक काही खर्च उद्भवू शकतात. उष्णतेच्या काही समस्या सतावू शकतात. सप्ताहाचा उत्तरार्ध मात्र नवीन उत्साहात, जोमात सुरू होईल. इच्छा, आकांक्षांची पूर्तता होईल. आपल्यातील कला, कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबात एखाद्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. आपली आर्थिक स्थिती उत्तम जरी असली तरी कोणाला उसने पैसे देण्यापासून दूर राहावे. कुटुंबाकडे लक्ष देऊन कुटुंबाप्रती आपल्या जबाबदाऱ्या समजून घ्याल.

धनु
सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी काही जबाबदाऱ्यांत वाढ होऊ शकते. त्यामुळे आपण आपले संपूर्ण लक्ष हे कामावर केंद्रित कराल. हा सप्ताह नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी उत्तम असून नोकरीत आपली कामगिरी चांगली राहिलं. सप्ताहाच्या मध्यात काही अनपेक्षित लाभ प्राप्ति संभवते. बऱ्याच दिवसांपासून घेत असलेल्या मेहनतीचे, कष्टाचे चीज या आठवड्यात होईल. अचानक काही सुवार्ता येतील. मित्रमंडळींच्या गाठीभेटी संभवतात. प्रियजनांच्या भेटीने सुखावून जाल. सप्ताहाच्या उत्तरार्धात खर्चात काहीशी वाढ होईल. त्यामानाने प्राप्ती सामान्यच राहीलं. मात्र आपल्यातील कौशल्य अधिक विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. आपण स्वतःवर अधिक लक्ष केंद्रित करावे. त्यामुळे अधिक चांगले कार्य करू शकाल.

मकर
सप्ताहाच्या सुरुवातीस काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अतिरिक्त खर्च व मानसिक तणाव यात वाढ होऊ शकते. आर्थिक प्राप्तीही सर्वसामान्य राहिलं. आपल्या अपेक्षित ध्येयप्राप्तीसाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. मात्र मेहनत करताना आपल्या शरीर स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अन्यथा थकवा जाणवू शकतो. कोणाशीही वाद विवादासारखे प्रसंग टाळा. सप्ताहाचा मध्य मात्र अतिशय अनुकूल असेल. बऱ्याच गोष्टी आपल्या इच्छेनुसार घडतील. आपल्या कामाचे यथोचित चांगले फळ आपणास मिळेल. आपल्या मान सन्मानात वाढ होईल. नोकरी-व्यवसायानिमित्त काही प्रवास संभवतात. काही धार्मिक स्थळी जाण्याचे योग देखील संभवतात. बऱ्याच दिवसांपासून आपण घेत असलेली मेहनत, कष्ट यांचे चीज या आठवड्यात होईल. त्यामुळे कर्तव्यपूर्तीचा आनंद देखील सप्ताहाच्या अखेरीस घ्याल. प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटी देखील संभवतात.

कुंभ
सप्ताहाच्या सुरुवातीला वैवाहिक जीवनातील प्रेम व स्नेह वृद्धिंगत होईल. वैवाहिक जोडीदाराच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे उभयतांमधील नाते अधिकच दृढ होईल. आणि आपण वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. सप्ताहाच्या मध्यात मात्र काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. काही चिंता वाढतील. निष्कारण वाद विवादासारखे प्रसंग उद्भवू शकतात. त्यामुळे धीर धरावा. कोणावरही अति विश्वास ठेवू नये. परंतु सप्ताहाच्या उत्तरार्धात परिस्थितीत सुधारणा होऊन आपणास सौख्याची, आनंदाची प्राप्ती होईल. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल. आपण आपल्या कामावर देखील लक्ष केंद्रित कराल. आपल्यावर सोपविलेली जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याकडे कल राहीलं. धार्मिक कार्यात देखील सहभागी व्हाल.

मीन
सप्ताहाच्या सुरुवातीस आरोग्याच्या काही चिंता सतावतील. प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. त्यामुळे तब्येतीची योग्य ती काळजी घ्यावी. काही विरोधक, हितशत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. मात्र आपण आपल्या बुद्धिचातुर्याने सर्वांवर यशस्वी मात कराल. जोडीदाराचे देखील उत्तम सहकार्य लाभेल.जोडीदाराची उत्तम साथ व सहकार्य मिळेल. सप्ताहाच्या मध्यात पुन्हा काही अडचणी, त्रास जाणवतील. काही संकटांना तोंड द्यावे लागू शकते. घरातील सदस्यांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. वायफळ गोष्टींवर वेळ वाया न घालवता केवळ आपल्या नित्य कर्मावर लक्ष केंद्रित करावे. त्यातूनच सप्ताहाच्या अखेरीस भाग्याचे प्राप्ती होईल.