“नक्षत्र”
आता आपण नक्षत्रांचा व राशींच्या प्रकारांचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आकाशातील विशिष्ट तारकांच्या समूहास नक्षत्र असे संबोधले जाते, अशी सर्वसाधारण व्याख्या आहे. ही नक्षत्रे वर्षानुवर्षे आहेत त्याच स्थितीत स्थिर आहेत. काही नक्षत्रे ही एक एक ताऱ्यांच्या समूहाची आहेत तर काही नक्षत्रे ही तीन, चार अथवा अधिक ताऱ्यांच्या पुंजक्यांनी बनलेली आहेत.
आपली पृथ्वी ही दीर्घ वर्तुळाकार बनलेली असून ती आपल्या आसाभोवती सतत भ्रमण करीत असते. पृथ्वीचे दोन गोलार्ध मानण्यात आलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे उत्तर गोलार्ध व दुसरा म्हणजे दक्षिण गोलार्ध होय. या गोलार्धांचे मध्यबिंदू उत्तर धृव व दक्षिण धृव म्हणून ओळखले जातात. दक्षिण धृव व उत्तर धृव यापासून पृथ्वीच्या पाठीवर समान अंतरावर कल्पिलेल्या वर्तुळाकार रेषांना विषववृत्त असे म्हणतात. पूर्वेकडून पश्चिमेकडे जे त्यात अंतर मानले जाते त्यास रेखांश असे म्हणतात. याच रेखांशावरून ज्या वर्तुळभागात सूर्य फिरतांना दिसतो त्यास क्रांतिवृत्त असे म्हणतात. आता आपण जे समजून घेतले ते फक्त ज्योतिषशास्त्राशी निगडित आहे, असे नाही. शाळेमध्ये भूगोलाच्या शिक्षकांनी शिकविलेले जर तुम्हाला आठवत असेल तर ते सर्व हेच होते. याचाच अर्थ आजच्या आधुनिक काळामध्ये खगोलशास्त्राने या गोष्टी मान्य केल्या आहेत ज्या आपल्या ऋषीमुनींनी कित्येक हजार वर्षांपूर्वी सांगून ठेवलेल्या आहेत. आजच्या आधुनिक काळातील अशा अनेक गोष्टी आहेत ज्याद्वारे सर्व जगाला ओरडून सांगता येईल की, ज्योतिषशास्त्र हे एक शास्त्र आहे. जे आजच्या विज्ञानापेक्षाही प्रगत आहे.’’
असो, आपण नक्षत्रांचा अभ्यास करीत होतो. स्थिर नक्षत्रे ही सारख्याच अंतरावर असतात, असे नाही. म्हणून सूर्याच्या क्रांतिवृत्त मार्गावर नक्षत्र मंडलाचे जे प्रारंभ स्थान ठरलेले आहे त्यापासून या संपूर्ण क्रांतिवृत्ताचे एकंदर २७ काल्पनिक सारखे भाग पाडलेले आहेत. या प्रत्येक भागास नक्षत्र असे म्हणतात. म्हणजेच चंद्र आकाशात परिभ्रमण करीत असता त्यातील एक विभाग चालण्याच्या काळास नक्षत्र म्हणतात. एक वर्तुळ ३६० अंशाचे असते. त्याचे २७ समान विभाग केले म्हणजे प्रत्येक नक्षत्र हे १३ अंश २० कला एवढ्या व्याप्तीचे होते. चंद्र परिभ्रमण करणा-या ह्या नक्षत्रास चंद्र नक्षत्र असे म्हणतात. चंद्राची दररोजची गती १२ अंश ते १५ अंशांपर्यंत कमी जास्त होत असल्यामुळे त्याचे नक्षत्र भ्रमण त्याचप्रमाणे कमी जास्त काळात होत असते. पंचागांमध्ये रोजची नक्षत्रे दिलेली असतात.
आता आपण २७ नक्षत्रांची नावे जाणून घेणार आहोत.
१) अश्विनी २) भरणी ३) कृत्तिका ४) रोहिणी ५) मृग ६) आर्द्रा ७) पुनर्वसू ८) पुष्य ९) अश्लेषा १०) मघा ११) पूर्वा फाल्गुनी १२) उत्तरा फाल्गुनी १३) हस्त १४) चित्रा१५) स्वाती १६) विशाखा १७) अनुराधा १८) ज्येष्ठा १९) मूळ २०) पूर्वाषाढा २१) उत्तराषाढा २२) श्रवण २३) धनिष्ठा २४) शततारका २५) पूर्वा भाद्रपदा २६) उत्तरा भाद्रपदा २७) रेवती
Click Here:- तुमची दैनिक राशीभविष्य येथे तपासा
या नक्षत्रांखेरीज अभिजीत या नावाने आणखीन एक नक्षत्र आहे. पण त्याची व्याप्ती स्वतंत्र नाही तर उत्तराषाढा नक्षत्राचे शेवटचे चरण (३ अंश २० कला) व श्रवण नक्षत्राचे पहिले चरण मिळून अभिजीत हे नक्षत्र समजले जाते.
राशी म्हणजे काय? हे आपण मागे अभ्यासले आहे. आता आपण राशींचे विविध प्रकार अभ्यासणार आहोत. राशीची निर्मिती करतांना किती सखोल विचार करण्यात आलेला आहे, हे राशींचे विविध प्रकार व गुणधर्मांवरून आपल्या लक्षात येऊ शकते. प्रत्येक राशीचा एक ग्रह मालक आहे. त्याला राशी स्वामी असेही म्हणतात. त्यांचा आधी आपण अभ्यास करणार आहोत.
१) मेष राशीचा स्वामी मंगळ ७) तूळ राशीचा स्वामी शुक्र
२) वृषभ राशीचा स्वामी शुक्र ८) वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ
३) मिथुन राशीचा स्वामी बुध ९) धनू राशीचा स्वामी गुरू
४) कर्क राशीचा स्वामी चंद्र १०) मकर राशीचा स्वामी शनी
५) सिंह राशीचा स्वामी रवी ११) कुंभ राशीचा स्वामी शनी
६) कन्या राशीचा स्वामी बुध १२) मीन राशीचा स्वामी गुरू
राशीचे दोन प्रकार आहेत –
१) पुरुष तत्त्व राशी २) स्त्री तत्त्व राशी
पुरुषतत्त्वाच्या राशी मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनू, कुंभ
स्त्रीतत्त्वाच्या राशी वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर, मीन
राशींच्या स्वभावानुसार हे दोन प्रकार पाडण्यात आलेले आहेत. त्यामुळे पुरुषतत्त्वाच्या राशींमध्ये थोडासा कणखरपणा व परखडपणा दिसून येतो. स्त्रीतत्त्वाच्या राशींमध्ये वागण्यात थोडा सौम्यपणा दिसून येतो. या राशी मायाळू व प्रेमळ असतात.
बारा राशी अग्नी, पृथ्वी, वायू, जल अशा एकूण चार तत्त्वांमध्ये मोडतात. प्रत्येक तत्त्वामध्ये तीन राशी असतात.
१) अग्नी म्हणजे स्वभावाने कठोर, दाहक
२) पृथ्वी म्हणजे स्वभावाने समंजस
३) वायू म्हणजे स्वभावाने चंचल, गतीशील
४) जल म्हणजे स्वभावाने हळवा
अशा प्रकारे तत्त्वांनुसार राशीचे स्वभावही स्पष्ट होतात.
अग्नितत्त्व १-मेष, ५-सिंह, ९-धनू या राशींचा समावेश होतो.
पृथ्वीतत्त्व २-वृषभ, ६-कन्या, १०-मकर या राशींचा समावेश होतो.
वायुतत्त्व ३-मिथुन, ७-तूळ, ११-कुंभ या राशींचा समावेश होतो.
जलतत्त्व ४-कर्क, ८-वृश्चिक, १२-मीन या राशींचा समावेश होतो.
याशिवाय राशींचे चर रास, स्थिर रास व द्विस्वभावी रास असेही तीन प्रकार पडतात. एका प्रकारामध्ये चार राशींचा समावेश होतो.
चर राशी मेष, कर्क, तूळ, मकर या राशींचा समावेश होतो
स्थिर राशी वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ या राशींचा समावेश होतो
द्विस्वभाव राशी मिथुन, कन्या, धनू व मीन या राशींचा समावेश होतो
“आम्ही आशा करतो की तुम्हाला आमचा नक्षत्र सारखा नक्षत्र लिहिलेला ब्लॉग आवडला असेल आणि ब्लॉग वाचण्यासाठी आमच्याशी जोडलेले रहा.”
Facebook Marathi:- Astroguru Dr. Jyoti Joshi
Facebook Hindi:- Astro Gurumaa Dr. Jyoti Joshi
Youtube Marathi:- Astroguru Dr Jyoto Joshi
Youtube Hindi:- Astro Guruma Dr Jyoti Joshi
Dr Jyoti Joshi Books:- Best Selling Book
धन्यवाद ।
शुभम भवतु ।।
“एस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी”