सोमवार, ०८ एप्रिल २०२४
राशिफल
सोमवार, ०८ एप्रिल २०२४
{ आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }
मेष
आज काही मनस्तापदर्शक प्रसंग घडतील. पण आपला तोल ढळू देऊ नका. संततीवर खर्च संभवतात.
वृषभ
आज काही अनपेक्षित लाभाची प्राप्ती होईल. घरातील सदस्यांचे प्रेम लाभेल. आज आपल्यातील कलागुणांना योग्य वाव मिळेल.
मिथुन
आज कर्तव्यपूर्ती करताना काही धाडसी निर्णय घ्याल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपल्या कामातच आज आनंद शोधण्याचा प्रयत्न कराल.
कर्क
आजचा दिवस आपणासाठी उत्साहाचा, आनंदाचा असेल. गुरुजन, पूजनीय व्यक्तींचा सहवास लाभेल. त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील.
सिंह
आजचा दिवस मनस्तापाचा असेल. काही मनाविरुद्ध गोष्टी घडतील. त्यामुळे चिडचिड, दगदग संभवते.
कन्या
आजच्या दिवशी व्यवसाय वृद्धीसाठी काही खर्च संभवतात. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
तुळ
आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही ठरवलेली कामे करण्यात अडसर येईल. यामुळे मानसिक दडपण येईल. मन शांत ठेवा.
वृश्चिक
आज आपले छंद जोपासण्यासाठी प्रयत्नशील राहाल. आज मुलांना जास्त वेळ द्याल. त्यांच्यासोबत वेळ मजेत निघून जाईल.
धनु
आज घरात कुटुंबीयांसमवेत आनंदात वेळ घालवाल. त्यांच्या सहकार्याने आज घरातील काही महत्त्वाची कामे पूर्णत्वास न्याल.
मकर
आज भावंडांशी काही मतभेद होणार नाही याची काळजी घ्या. काही महत्त्वाचे निर्णय घेताना पुनश्च एकदा विचार अवश्य करा.
कुंभ
आज कुटुंबीयांचे उत्तम सहकार्य प्राप्त होईल. काही महत्वपूर्ण आर्थिक व्यवहार आज पूर्ण कराल. त्यात घरातील सदस्यांचे मत विचारात घ्या.
मीन
आज स्वतःसाठी वेळ काढा. बऱ्याच दिवसांपासून मनात असलेली कामे आज पूर्ण कराल. आजच्या सुंदर दिवसाचा आवश्य लाभ करून घ्या.