बुधवार, ०१ नोव्हेंबर २०२३
![](https://drjyotijoshi.com/wp-content/uploads/2023/10/01-11-2023-2-1024x1024.jpg)
![](https://drjyotijoshi.com/wp-content/uploads/2023/10/01-11-2023-1024x1024.jpg)
राशिफल
बुधवार, ०१ नोव्हेंबर २०२३
{ आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खुप खुप शुभेच्छा व आशीर्वाद }
मेष
आज कुटुंबीयांसमवेत दिवस अगदी मजेत व्यतीत कराल. कुटुंबियांसमवेत रुचकर,चविष्ट मेजवानीचा आस्वाद घ्याल. सर्वांच्या आवडी निवडी जपाल.
वृषभ
आजचा दिवस आपलाच आहे. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज स्वतः साठी वेळ काढाल. आपल्या आवडी निवडी आज जोपासाल. आजच्या दिवसाचा अवश्य लाभ करून घ्या.
मिथुन
आजचा दिवस काहीसा कष्टप्रद, तणावपूर्ण जाऊ शकतो. आज अत्यंत विचारपूर्वक खर्च करावेत. अनावश्यक वस्तूंची खरेदी टाळावी.
कर्क
आज उत्तम भौतिक सुखांची प्राप्ती कराल. आज होणाऱ्या लाभातून आनंदाची अनुभूती घ्याल. आज आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल.
सिंह
आजचा संपूर्ण दिवस कामात व्यस्त असाल. आज कामाला जास्त महत्त्व द्याल. हातातील कामे पूर्णत्वास नेण्याकडे कल राहीलं.
कन्या
आज आपल्या भाग्याने अपेक्षित लाभ, यशप्राप्ती कराल. नशिबाची आज उत्तम साथ लाभेल. त्याचा अवश्य लाभ करून घ्या.
तुळ
आजचा दिवस अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. मात्र आपण ध्येयावर लक्ष ठेवून शांतचित्ताने काम करावे.
वृश्चिक
आज जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. आपणही जोडीदाराला भरभरून प्रेम द्याल. आज जोडीदारास समवेत अमूल्य वेळ व्यतीत कराल.
धनु
आज तब्येतीच्या कोणत्याही तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रकृती अस्वस्थता जाणवेल. स्पर्धक, विरोधकही त्रास देण्याचा प्रयत्न करतील.
मकर
आज उत्तम संततीसौख्य प्राप्त होईल. मुलांच्या समवेत दिवस आनंदात व्यतित कराल. कलाकार मंडळी,खेळाडू यांच्यासाठी आश्वासक दिवस असेल.
कुंभ
आज घरातील वातावरण आनंदी,प्रसन्न राहील. आज उत्तम वाहन – वास्तूसौख्य लाभेल. घराच्या सजावटीसाठी काही वस्तूंची खरेदी कराल.
मीन
आजचा आपला दिवस पराक्रमाचा, धाडसाचा असेल. व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने एखादे महत्वाचे, धाडसी पाऊल उचलाल. भावडांचे सहकार्य लाभेल.