शुक्रवार, २२ सप्टेंबर २०२३
राशिफल
शुक्रवार, २२ सप्टेंबर २०२३
{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद}
मेष
आज काही पारिवारिक, कौटुंबिक समस्या सतावतील. मात्र आपण त्यावर समाधान शोधून काढाल.
वृषभ
आज काही अपेक्षित अडचणी उद्भवू शकतात. त्यामुळे सजगता बाळगावी. जोडीदाराशी वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
मिथुन
आज प्रकृतीत सुधारणा जरी वाटली तरी लगेच अतिश्रम करण्यास जाऊ नका. आरोग्याची काळजी घेणेच हितावह राहील.
कर्क
आज अतिउत्साह वा अतिश्रमाने आरोग्यावर परिणाम होणार नाही ना याची काळजी घ्यावी. आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये.
सिंह
आज उत्तम गृहसौख्य, कौटुंबिक सौख्य व वास्तूसौख्य आपणास लाभेल. कुटुंबीयांसमवेत मनसोक्त वेळ व्यतीत कराल. संततीकडेही लक्ष द्याल.
कन्या
आपल्यातील कलाकौशल्याला आज मेहनत व परिश्रमाची जोड देऊन आपले इप्सित साध्य कराल. आज आपल्यातील लेखन कौशल्यालाही उत्तम वाव मिळेल.
तुळ
आज उत्तम पारिवारिक सौख्याचा आनंद घ्याल. आपल्या खेळीमेळीच्या स्वभावाने आज कुटुंबातील सर्वांना आपला सहवास हवाहवासा वाटेल.
वृश्चिक
आजचा आपला दिवस नाविन्याने परिपूर्ण असेल. कुटुंबियांबरोबर काही छान क्षण व्यतीत कराल. आपल्या आनंदात आज जोडीदाराचेही सहकार्य लाभेल.
धनु
आज आपण अडचणी, विवंचना यांचा सामना करतच नवीन उभारी देखील घ्याल. खर्चाचा योग्य ताळमेळ साधाल.
मकर
गेल्या दोन दिवसांपासून होणाऱ्या लाभप्राप्तीने हुरळून न जाता खर्चाचे योग्य नियोजन ठेवणे आवश्यक राहील. विनाकारण कोणत्याही गोष्टीत लक्ष घालू नये.
कुंभ
आजच्या दिवशीही कामातच व्यस्त असाल. मात्र आपल्या कर्तव्यपूर्तीनंतर त्याची शुभ फळे आपणास निश्चितच मिळतील.
मीन
आज काही महत्वाची कामे पूर्ण करण्याकडे मनाचा ओढा राहील. आपणावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या आपण निश्चित पार पाडाल.