Skip to content

💐*शास्त्रीय ज्ञान पोहचलं जगभर
पूर्ण झाले दोन लाख सबस्क्राईबर*💐

सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपल्या सर्वांच्या सहकार्याने एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या आपल्या मराठी युट्युब चॅनलचे नुकतेच तब्बल दोन लाख सबस्क्राईबर पूर्ण झालेत . खरं सांगायचं तर युट्युब चॅनलसाठी ही फार छोटी बाब आहे. यापेक्षा इतर चॅनलचे सबस्क्राईबर खूप जास्त असतात. विशेषत: मनोरंजन, गॉसिप, न्यूज चॅनलची रेटिंग तर खूप असते. मात्र ज्योतिष ज्ञानासाठी समर्पित चॅनलला एवढे सबस्क्राईबर मिळणे, ही अभिमानाची बाब म्हणता येईल. वास्तविक पाहता हे चॅनल केवळ नि:शुल्क ऑनलाईन ज्योतिष अभ्यासक्रम चालविण्यासाठी आम्ही सुरु केलेलं होतं. ज्योतिषशास्त्राचा प्रचार-प्रसार करण्यासाठी, शास्त्रीय माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने व साध्या-सोप्या भाषेत 📚 सर्वांपर्यंत पोहचावी या उद्देशाने आम्ही हे चॅनल सुरु केलेले होते. महत्त्वाची बाब म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाची कुठलंही विशेष ज्ञान आमच्याकडे नव्हतं व आजही त्या बाबतीत आम्ही खूप मागे आहोत. तरीही दोन लाख सबस्क्राईबरचा टप्पा पार करणं, ही कुठंतरी आमच्या चांगल्या कामाची पोच पावतीच म्हणता येईल.

अभिमानाची बाब म्हणजे चॅनल मराठी भाषेत असूनही जगाच्या कान्याकोपऱ्यातील ज्योतिषप्रेमी या माध्यमातून आमच्याशी जुळलेत. हजारोच्या संख्येने ज्योतिषप्रेमी शास्त्राचा अभ्यास करु लागलेत. शास्त्रीय ज्ञान जगभग पोहचलं. या गोष्टीचा आम्हाला सर्वात जास्त अभिमान आहे. ही बाब आम्हाला अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देखील देत असते. इतक्या मोठ्या प्रतिसादाची आम्ही कधीही अपेक्षा केलेली नव्हती. खरं सांगायचं तर तो आमचा मूळ उद्देश देखील नव्हता. मात्र अपेक्षा नसतांनाही जी गोष्ट आपल्याला मिळते तेव्हा तिचा आनंद हा अवर्णिय असतो. तो शब्दांमध्ये पूर्णपणे व्यक्त केला जाऊ शकत नाही. म्हणून सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांना मन:पूर्वक आभार!

धन्यवाद !

शुभभ भवतु!
एस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी

 

इसी प्रकार की और ज्योतिष वीडियो देखने के लिए चैनल को सब्सक्राइब करे !

मराठी चैनल ->

हिंदी चैनल ->