आरोग्यासाठी ज्योतिषशास्त्र
आरोग्यासाठी ज्योतिषशास्त्र
माणसाच्या आयुष्यामध्ये आरोग्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच असू शकत नाही. म्हणूनच आरोग्यम धन संपदा असे आपल्याकडे म्हटले जाते. अनेकदा चालणारा, फिरणारा व्यक्ती अचनाक अंथरुणाला खिळतो, अनेकदा अशा दुर्धर आजाराचे निदान केले जाते की त्याविषयी आपण कल्पना सुद्धा केलेली असू शकत नाही. काही आजार वंश परंपरागत पद्धतीने चालत येतात. काही वेळेला अचानकपणे सर्दी, ताप, खोकला यासारखे छोटे छोटे आजार सुद्धा अचानकपणे येतात. तेव्हा तब्येतीचे काही खरे नाही, केव्हा काय होईल ते? असे सहजच आपण बोलून जातो. काही लोकांच्या घरात तर आजार इतका घुसलेला असतो की, त्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी ते आपली संपूर्ण जमापूंजी खर्च करुन टाकतात. तरही आराम मिळत नाही. परिवारातील एक सदस्य जरी आजारी असला तरी काळजी व प्रेमापोटी संपूर्ण घर त्याच्या अवती भोवती फिरत असते. कोणत्याही आजारचा संबंध फक्त आपल्याशी नव्हे तर आपल्या पत्रिकेतील ग्रहांशी सुद्धा असतो. झालेले आजार आणि भविष्यात होणारे आजार सुद्धा पत्रिकेतील ग्रह स्थितीवरुन ओळखता येऊ शकतात. पत्रिकेतील अष्टम स्थान आजाराशी संबंधीत असणारे स्थान आहे. असे असले तरी एखादा दुर्धर आजार आपल्याला होणार आहे, हे पत्रिकेवरुन कळले तरी त्याला टाळता येऊ शकत नाही. मात्र त्याची तिव्रता नक्कीच कमी करता येऊ शकते. म्हणून आरोग्याच्या दृष्टीकोनातून आपली किंवा आपल्या प्रियजनांची पत्रिका एकदा दाखवायला विसरु नका.