Skip to content

नोकरीसाठी ज्योतिषशास्त्र

नोकरीसाठी ज्योतिषशास्त्र

आपल्या देशातील लोकसंख्या पाहता त्यातील बहुसंख्य लोक आज नोकरदार आहेत आणि त्यांच्या एवढेच किंवा त्यांच्यापेक्षा जास्त संख्येने बेरोजगार आहेत जे चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्याकाही काहींना किंवा सर्वांनाच कुठला ना कुठली नोकरी कधीतरी मिळेलच. मात्र ती कधी मिळेल, कशी मिळेल? कुठे मिळेल? हे अगदी ते सुद्धा स्वतः सांगू शकणार नाहीत. मात्र त्यांच्या पत्रिकेतील ग्रह स्थितीवरुन ते सांगता येऊ शकते. सर्वसाधारणपणे प्रत्येकाची अपेक्षा ही असते की, आपले शिक्षण, पात्रता आणि क्षमतांना अनुरुप असेल अशी नोकरी आपल्याला  मिळाली पाहिजे. त्यात मुबलक किंवा जगण्यासाठी आवश्यक तेवढा पैसाही पाहिजे. मात्र असे होत नाही. कुठल्याही सरकारी विभागामध्ये शिपाई पदाची भरती निघाल्यास त्यासाठी एम.ए., बी.एड. झालेल्या उमेदवारांचे अर्ज येतात त्यावरुन आपण परिस्थितीची कल्पना करु शकतो. अशा पद्धतीने मिळविलेल्या नोकरीमध्ये मन रमत नाही. तसेच काही वेळेला आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या, कमी ज्ञान असलेल्या लोकांच्या हाताखाली राबावे लागते. अनेक उच्चशिक्षित असणा-यांनी चहा, वडापाव गाडी टाकल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. किंवा नोकरीत मन रमत नाही म्हणून धरसोड करणा-यांची सुद्धा काही कमी नाही. हे सगळं घडतं. कारण पत्रिकेतील ग्रहांच्या स्वभावानुसार आपण क्षेत्र निवडत नाही. म्हणून आपल्या किंवा आपल्या प्रियजनांच्या पत्रिकेतील नोकरी विषयी जाणून घेण्यासाठी एकदा अवश्य भेटा आणि जीवनाला समृद्ध, सुखी, समाधानी बनवा.

ज्योतिष मार्ग दर्शनासाठी खालील पद्धतीने संपर्क करावा

1 ते 3 प्रश्न.1 फोन काॕल