गुरूवार, २३ ऑक्टोबर २०२५
राशिफल
गुरूवार, २३ ऑक्टोबर २०२५
*मेष*
आज सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न कराल. व्यापारी वर्गासाठी हा दिवस आशादायक ठरू शकतो. व्यावसायिक भागीदारांशी सामंजस्याने वागा.
*वृषभ*
आजचा दिवस निराशाजनक असू शकतो. आरोग्याच्या काही समस्या सतावू शकतात. प्रकृती अस्वस्थता जाणवेल. आज आपल्या गुणांची आणि क्षमतांची हवी तेवढी कदर केली जाणार नाही.
*मिथुन*
आजचा दिवस आपल्यासाठी खूप चांगला असेल. आज काही नवीन संधी, नवी आशा निर्माण होतील. आपल्या आंतरिक कलांचा वापर करून आनंदाची अनुभूती घ्याल.
*कर्क*
आजचा दिवस घरातील सदस्यांसोबत घरगुती कामात आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. आज तुमचा कल घराच्या सजावटीकडे असेल. घरात उत्साहाचे वातावरण राहील.
*सिंह*
आज आपण आपल्या हुशारीने अनेक महत्त्वाची कामे करू शकाल. आपल्यातील उपजत कलेच्या माध्यमातून आज अर्थार्जन कराल. आज व्यवसाय वृद्धीचाही विचार कराल.
*कन्या*
आज कौटुंबिक आनंदाचा अनुभव घ्याल. आज घरच्यांच्या इच्छेचा मान ठेवाल. काही महत्त्वाची कामे पूर्ण करताना कुटुंबाचे मत विचारात घ्याल.
*तुळ*
आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने भरलेला असेल. आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन ऊर्जा आणि अभूतपूर्व उत्साहाने भरलेला असेल.
*वृश्चिक*
आजचा दिवस तणावपूर्ण असू शकतो. आज काहीशी मानसिक अस्थिरता जाणवू शकते. शक्य असल्यास कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
*धनु*
आजच्या दिवशी सुख, आनंद आणि लाभ प्राप्तीची शक्यता आहे. आजचा दिवस चांगला जाईल. प्रियजनांच्या सहवासातून सौख्य मिळेल.
*मकर*
आज आपण दिवसभर आपल्या कामावर लक्ष केंद्रित कराल. हाती घेतलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. मात्र कामाचा थोडासा तणाव जाणवेल.
*कुंभ*
बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर, आजचा सुंदर आणि अद्भुत दिवस आलेला आहे. आपला उत्साह आणि योग्य परिश्रमाने तुम्ही समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडाल. आज आपल्या आवडी – निवडीसाठी वेळ काढाल.
*मीन*
आजचा दिवस निराशाजनक असू शकतो. तर्कहीन चिडचिड, भांडणे, वाद टाळा. अन्यथा, नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो.