Skip to content

शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५

राशिफल

शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५

*मेष*
आजचा दिवस आपल्यासाठी भाग्याची, सौख्यची प्राप्ती करणारा असेल. काही अध्यात्मिक गोष्टी करण्याकडेच कल राहील. त्या निमित्ताने प्रवास देखील संभवतात.

*वृषभ*
आजचा दिवस काहीसा ताणतणाव, चिंता यांनी युक्त असेल. काही अडचणींचा देखील सामना करावा लागू शकतो. आज कोणावरही विश्वास ठेवून चालणार नाही.

*मिथुन*
आज उत्तम वैवाहिक सुखाची प्राप्ती होईल. आजच्या दिवशी जोडीदाराचे मत त्याच्या भावनांचा आदर करा. सामंजस्याची भूमिका नाते अधिक दृढ करेल.

*कर्क*
आजचा दिवस आपणासाठी काहीसा खडतर असेल. काहीशी मानसिक, शारिरीक अस्थिरता जाणवेल. मनाप्रमाणे घटना घडणार नाही.

*सिंह*
आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहवर्धक, आनंदाचा, नव चैतन्याचा असेल. आजचा दिवस आनंदात, मजेत, मनाजोगता व्यतित कराल. आज निरर्थक गोष्टीत वेळ वाया घालवू नका.

*कन्या*
आजचा दिवस घरच्यांबरोबर मजेत व्यतित कराल. घरातील ज्येष्ठांची सेवा कराल. त्यांचे आशीर्वाद प्राप्त कराल. घरात काही नवीन वस्तूंची खरेदी संभवते.

*तुळ*
आजचा आपला दिवस पराक्रमाचा, साहसाचा असेल. मात्र कोणताही निर्णय घाई गडबडीत घेवू नये. महत्वाचे निर्णय घेतांना वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्यावा.

*वृश्चिक*
आज कुटुंबातील सदस्यांशी विनाकारण कोणतेही गैरसमज निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्या. कोणतेही आर्थिक व्यवहार सांभाळून करा.

*धनु*
आजचा दिवस आपणासाठी उत्तम असणार आहे. नवीन ऊर्जा, उत्साह यांचा अनुभव घ्याल. मात्र विनाकारण राग वा चिडचिड होणार नाही याची काळजी घ्या.

*मकर*
आजचा दिवस काहीसा मनस्तापदर्शक असेल. अचानक काही खर्च उद्भवतील. आज कोणतेही महत्त्वाचे व्यवहार करण्याचा विचार करू नका. आज केवळ आपले नित्य काम करा.

*कुंभ*
आज दिवस लाभ, सौख्य, आनंद प्राप्तीचा असेल. त्याचा पुरेपूर लाभ करून घ्या. काही मोहात पाडणारे प्रसंग निर्माण होऊ शकतात. मात्र आपण सावध राहावे.

*मीन*
आजचा आपला दिवस कर्म प्रधान असणार आहे. एक नवीन ऊर्जा आपल्यात जाणवेल. त्यामुळे झपाट्याने कामे पूर्ण करण्याकडे आपला कल राहिलं. वरिष्ठ ही मेहेरबान राहतील.