Skip to content

बुधवार, ११ जुन २०२५

राशिफल

बुधवार, ११ जुन २०२५

*मेष*
आजचा दिवस काहीसा कष्टप्रद, संघर्षमय जाऊ शकतो. विनाकारण चिडचिड, त्रागा होऊ शकतो. आजचा दिवस संयमाने व धीराने व्यतीत करणे आवश्यक राहील.

*वृषभ*
आजच्या दिवशी जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य मिळेल. जोडीदारासमवेत आजचा दिवस आनंदात, मजेत व्यतीत कराल.

*मिथुन*
आजच्या दिवशी काहीसा तणाव,दबाव जाणवेल. कोणावरही अतिविश्वास ठेवू नये.आरोग्याची काळजी घेणे आवश्यक राहिलं. संयम व सबुरीने आजचा दिवस व्यतीत करा.

*कर्क*
आजचा दिवस उत्तम असणार आहे. अभूतपूर्व उत्साह आणि नावीन्याचा अनुभव घ्याल. क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींसाठी आश्‍वासक दिवस असेल. विद्यार्थ्यांनादेखील अभ्यासासाठी उत्तम दिवस.

*सिंह*
आजच्या दिवशी उत्तम गृहसौख्य, वास्तू – वाहन सौख्य लाभेल. घरातील मंडळींसमवेत आजचा दिवस छान व्यतीत होईल. घरातील ज्येष्ठ मंडळींची सेवा सुश्रुषा कराल.

*कन्या*
आजचा आपला दिवस पराक्रमाचा, धाडसाचा असेल. काही महत्वपूर्ण निर्णय घ्याल. आज काही अनपेक्षित लाभ संभवतात मात्र कोणत्याही परिस्थितीत आपला तोल ढळणार नाही याची काळजी घ्यावी.

*तुळ*
आजच्या दिवशी कौटुंबिक, पारिवारिक सौख्याचा आनंद घ्याल. आज पाहुण्यांची रेलचेल संभवते. आज काही आर्थिक व्यवहार देखील पूर्ण कराल.

*वृश्चिक*
आजचा आपला दिवस अतिशय उत्साहाने, आनंदाने व्यतीत कराल. आज आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. त्यामुळे आनंद द्विगुणित होईल. जोडीदाराचेही सहकार्य लाभेल.

*धनु*
आजच्या दिवशी काही अप्रिय गोष्टी, घटना घडू शकतात. त्यामुळे मनस्ताप संभवतो. अचानक काही अनपेक्षित खर्च उद्भवतील. त्यामुळे खर्चाचे गणित काहीसे बिघडेल.

*मकर*
बऱ्याच दिवसांपासून घेत असलेल्या मेहनतीची शुभ फलिते आज प्राप्त होतील. काही इच्छा, आकांक्षा यांची पूर्तता आज होईल. त्यामुळे आनंदून जाल.

*कुंभ*
आजचा आपला दिवस काहीसा कामात व्यस्त जाईल. कामाच्या व्यग्रतेमुळे काहीसा थकवा जाणवेल. मात्र दिवसा अखेरीस कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळेल.

*मीन*
आजचा दिवस आपणासाठी उत्तम असेल. बऱ्याच गोष्टी मनाप्रमाणे घडतील. काही प्रवासाचे योग देखील संभवतात. काही प्रियजनांचा सहवास लाभेल.